Nagpur Latest News:  Saamtv
महाराष्ट्र

Nagpur Breaking News: पब्जीचा नाद, वाढदिवसालाच झाला घात! मध्यरात्री तोल जाऊन तलावात पडला; 'बर्थडे बॉय'चा दुर्दैवी मृत्यू

Nagpur Latest News: रात्री कुटुंबियांसोबत वाढदिवस साजरा केल्यानंतर तो आपल्या मित्राला पार्टी देण्यासाठी बाहेर पडला. मात्र सकाळी लवकर दुकाने बंद असल्याने तो आणि त्याचा मित्र अंबाझरी तलावावर पंप हाऊसजवळ जाऊन पब्जी खेळत बसले.

Gangappa Pujari

पराग ढोबळे, नागपूर |ता. १३ जून २०२४

मध्यरात्री पब्जी खेळताना अंबाझरी तलावाच्या पंप हाऊसच्या खड्ड्यात पडून बर्थडे बॉयचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नागपुरमध्ये घडली. पुलकित शहदादपुरी असे या तरुणाचे नाव असून तो वाढदिवसाची पार्टी देण्यासाठी घराबाहेर पडला होता. या मन सुन्न करणाऱ्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुलकित शहदादपुरी (वय, १६) इयत्ता अकरावीत शिकत होता. ११ जून रोजी त्याचा वाढदिवस होता. रात्री कुटुंबियांसोबत वाढदिवस साजरा केल्यानंतर तो आपल्या मित्राला पार्टी देण्यासाठी बाहेर पडला. मात्र सकाळी लवकर दुकाने बंद असल्याने तो आणि त्याचा मित्र अंबाझरी तलावावर पंप हाऊसजवळ जाऊन पब्जी खेळत बसले.

पहाटे 4 वाजताच्या सुमारास दुकाने उघडले असतील म्हणून ते जाण्यासाठी निघाले. मात्र रात्रीच्या अंधारात पात्रात असलेल्या खोल खड्डा लक्षात आला नाही, ज्यामुळे तोल जाऊन पुलकित त्यामध्ये पडला. मित्राने आवाज देऊनही पुलकितने प्रतिसाद न दिल्याने घाबरुन त्याने त्याच्या कुटुंबियांना फोन करुन माहिती दिली.

दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच कुटुंबियांनी पोलिसांना कळवले तसेच घटनास्थळी धाव घेतली. शोध पथकाच्या मदतीने पुलकीतचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. शवविच्छेदनानंतर त्याचे पार्थिव कुटुंबियांना देण्यात आले. वाढदिवसादिनीच मुलावर काळा घातल्याने आई- वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News: कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा! पलावा पुल आजपासून नागरिकांसाठी सुरू|VIDEO

Sanjay Raut : हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर संजय राऊतांची तिखट प्रतिकिया

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

SCROLL FOR NEXT