रूपाली बडवे, साम टीव्ही मुंबई
राज्यसभेसाठी अजित पवार गटाकडून आज सुनेत्रा अजित पवार यांचा अर्ज भरला जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. लोकसभेतील पराभवानंतर सुनेत्रा पवार राज्यसभेवर असण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास सुनेत्रा पवारांचा अर्ज भरणार असल्याची माहिती मिळत आहे. राज्यसभेचा अर्ज भरण्यासाठी प्रदेशाध्यक्ष, मंत्री आणि आमदार राहणार उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राज्यसभेच्या अधिकृत उमेदवाराची घोषणा आज सकाळी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी पत्रकार परिषदमध्ये ही माहिती दिली (Maharashtra Politics) आहे. प्रफुल पटेल यांची जागा रिक्त झाल्यामुळं राज्यसभेची पोटनिवडणूक (Rajya Sabha By Election) होत आहे. आता त्यांच्याजागी कुणाची वर्णी लागतेय हे पाहणं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
राज्यसभेच्या जागेसाठी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांची नावं चर्चेत आहेत. दरम्यान सुनेत्रा पवार यांना संधी मिळू शकते, अशी माहिती समोर येत आहे. लोकसभेतील पराभवानंतर सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची राज्यसभेवर वर्णी लागणार का, असा प्रश्न निर्माण होत आहे. आज अजित पवार गटाकडून त्यांच्या नावाचा अर्ज भरण्याची शक्यता आहे. दुपारी बारा वाजल्यानंतर हे चित्र स्पष्ट (NCP) होईल.
राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख आहे. पक्षातील कार्यकर्त्यांनी अजित पवारांना पत्र लिहून सुनेत्रा पवार यांना राज्यसभेत पाठवण्याची मागणी केली आहे. सुनेत्रा पवार राज्यसभेत गेल्यास बारामतीच नाही, तर पश्चिम महाराष्ट्रात देखील पक्षाला बळ मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. आता अजित दादा (Ajit Pawar) काय निर्णय घेणार, याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.