Black and White saam tv
महाराष्ट्र

Black and White: ‘जैनांची नगरी’ म्हणालो, पण...; नरेंद्र मेहतांचं Exclusive मुलाखतीत स्पष्टीकरण; नेमकं काय म्हणाले?

Narendra Mehta exclusive interview: ‘मीरा-भाईंदर जैनांची नगरी’ या वक्तव्यावर भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी ‘ब्लॅक अँड व्हाईट’मध्ये खुलासा केला. भाषणाचा संदर्भ, मराठी-अमराठी वाद आणि एंटी मराठी आरोपांवर त्यांनी सकाळ मीडियाचे संपादक निलेश खरे यांच्या मुलाखतीत भूमिका स्पष्ट केली.

Surabhi Jayashree Jagdish

मीरा-भाईंदरमध्ये सध्या मराठी विरुद्ध उत्तर भारतीय आणि ‘जैनांची नगरी’ या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे.भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या ‘मीरा-भाईंदर जैनांची नगरी’ या वक्तव्यावरूनही मोठा वाद झाला होता. या पार्श्वभूमीवर सकाळ मीडियाचे मुख्य संपादक निलेश खरे यांनी ‘ब्लॅक अँड व्हाईट’ या खास कार्यक्रमात भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची एक्स्लुसिव्ह मुलाखत घेतली. या मुलाखतीत मेहतांनी त्यांच्या ‘जैनांची नगरी’ या वक्तव्याचा नेमका अर्थ सांगितला. तसेच मराठी-अमराठी वादात आपली भूमिका काय आहे, यावरही त्यांनी स्पष्ट भाष्य केलं.

सध्या मीरा-भाईंदरमध्ये मराठी विरुद्ध उत्तर भारतीय किंवा ‘जैनांची नगरी’ अशा स्वरूपाची चर्चा सुरू आहे. या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपही होत आहेत. या सगळ्या वादाच्या केंद्रस्थानी आमदार नरेंद्र मेहता आहेत. सामच्या ‘ब्लॅक अँड व्हाईट’ शोमध्ये मेहता यांनी याबाबत स्पष्ट माहिती दिलीये.

‘माझं भाषण कट शॉट करून दाखवलं’

‘मीरा-भाईंदर जैनांची नगरी’ या वक्तव्याबाबत विचारलं असता नरेंद्र मेहता म्हणाले, “आहे हे जरा कट शॉट करून दाखवलं. माझं भाषण असं होतं की, मी सर्व समाजाला घेऊन काम करतो. माझा जन्म जैन कुलमध्ये झाला आणि म्हणून जैनांसोबत माझं वेगळं नातं आहे. आणि त्याच्यासोबत वेगळी जबाबदारी आहे.”

पुढे ते म्हणाले, “मी ज्या भागातून येतो त्याला जैनांची नगरी... भाईंदर वेस्ट हे जैनांची नगरी आहे. मी कुठल्याही इतर समाजाला कमीपणा दाखवण्याचं किंवा त्याच्याशी तुलना करण्याचं माझं भाष्य नव्हतं. पण त्याला वेगळा दाखवण्यात आलं. त्या भागात मराठी माणसासाठी जे जे करायचं ते मी केलंय. मुळात कोणीतरी त्याला वेगळा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. माझा तसा हेतू नाही,” असंही नरेंद्र मेहता यांनी स्पष्ट केलं.

‘मी एंटी मराठी कसा झालो?’

नरेंद्र मेहतांवर तुम्ही ‘एंटी मराठी’ आहात, असा आरोप केला जातो. मीरा-भाईंदरमध्ये केवळ १८ टक्के मराठी लोकसंख्या आहे. त्यामुळे तुम्ही मराठी लोकांना बाजूला करून उत्तर भारतीयांची बाजू घेता, असा आरोपही त्यांच्यावर होतो.

यावर उत्तर देताना नरेंद्र मेहता म्हणाले, “माझ्याकडे १८ टक्के मराठी असेल तरी ५० टक्के नगरसेवक मराठी आहेत. माझ्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली. यामध्ये मी ५० टक्के मराठी माणसाला तिकीट दिलंय. त्यामध्ये जातीवाद असा भेदभाव नाही केला.”

“प्रत्येक समाजाला स्थान मिळावं ही आमची इच्छा आहे. त्यामुळे आजही ५० टक्के मराठी आहेत, तरी मी एंटी कसा झालो?” असा सवालही नरेंद्र मेहता यांनी केला. यासोबतच आपल्या पर्सनल स्टाफमध्येही १०० टक्के मराठी माणसं असल्याचं नरेंद्र मेहता यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ‘नेहरूंचा उदो-उदो करा, पण बाबासाहेबांचे अवमूल्यन करू नका’; भाई गिरकरांचा अभिजीत दिपकेंवर निशाणा

Dark Circle: डोळ्यांभोवती काळी वर्तुळं वाढलीयेत का? ही आहेत खरी कारणं

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लान, १०० विद्यामान आमदारांचे पत्ते कट होणार? राजकीय वर्तुळात खळबळ

Boiler Explosion : कारखान्यात अचानक बॉयलर फुटला; ५ जणांचा जागीच मृत्यू, अनेक कामगार अडकल्याची भीती?

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये कधी जमा होणार? पीएम किसान योजनेबाबत मोठी अपडेट समोर

SCROLL FOR NEXT