vande bharat express saam tv
महाराष्ट्र

Vande Bharat : परभणी, नांदेडला मिळाली वंदे भारत एक्सप्रेस, मुंबईहून कधी सुटणार, तिकिट किती?

Vande Bharat Extended to Nanded, Parbhani : मुंबई-जालना वंदे भारत आता परभणीमार्गे नांदेडपर्यंत धावणार आहे. प्रवाशांना आरामदायी प्रवासाची संधी मिळणार असली तरी संभाजीनगरच्या प्रवाशांनी नव्या वेळापत्रकावर नाराजी व्यक्त केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai to Nanded Vande Bharat Express : नांदेड आणि परभणी या दोन शहरातून आता वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. कारण, मुंबई ते जालना वंदे भारत एक्सप्रेसचा मार्ग नादेंडपर्यंत वाढवण्याचा निर्णय रेल्वेकडून घेण्यात आला आहे. नांदेड आणि लातूर या दोन शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी छत्रपती संभाजीनगरमधील प्रवाशांना मात्र त्रास सहन करावा लागणार आहे, त्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई-जालना वंदे भारत एक्स्प्रेसचा मार्ग नांदेडपर्यंत वाढवण्यात आला आहे. ही एक्सप्रेस परभणीमार्गे नांदेडला पोहचणार आहे. मराठवाड्यातून मुंबईला आता आरामदायी प्रवास करता येणार आहे. त्याशिवाय नांदेड येथील हजूर साहिब गुरुद्वाराला भेट देणाऱ्या शीख भाविकांना कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. दरम्यान, रेल्वे अधिकाऱ्यांनी नांदेड विस्ताराच्या उद्घाटनाची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.

कोण कोणते थांबे असणार - Vande Bharat extended to Nanded via Parbhani – full route and stoppage details

CSMT साठी निघणारी जालना येथून धावणारी वंदे भारत आणि नांदेड येथून धावणार आहे. परभणी, जालना, संभाजीनगर, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण या प्रमुख स्थानकांवर वंदे भारत थांबेल.

तिकिट किती असेल? - Mumbai to Nanded Vande Bharat Express train timing and ticket price

नांदेड ते सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकिाबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण एसी चेयर कारचे तिकिट अंदाजे 1750 रुपये, एक्जीक्यूटिव एसी चेयर कार 3303 रुपये इतके असू शकते. सध्या वंदे भारत जालनापर्यंत धावत आहे, लवकरच ही एक्सप्रेस नांदेडपर्यंत धावणार आहे.

वेळ काय ?

वंदे भारत एक्सप्रेस नांदेड येथून पहाटे ५ वाजता सुटेल. परभणी ५. ४० वा., जालना ७. २० वा. तर छत्रपती संभाजीनगरात सकाळी ८. १३ वाजता येईल आणि मुंबई येथे दुपारी २. २५ वाजता पोहचणार आहे. परतीच्या प्रवासावेळी वंदे भारत मुंबई सीएसएमटी स्थानकामधून दुपारी १. १० वाजता निघून संभाजीनगरात सायंकाळी ७. ०५ वाजता पोहचेल. तर जालना ८ . ०५ वा. , परभणी ९. ४३ वा. येऊन नांदेड येथे रात्री १०. ५० वाजता पोहचेल.

छत्रपती संभाजीनगरच्या प्रवाशांना त्रास

रेल्वे बोर्डाने मुंबई-जालना वंदे भारत ट्रेनचा मार्ग नांदेडपर्यंत वाढवण्यास मंजुरी दिली. पण या निर्णयामुळे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावरील प्रवाशांना नव्या वेळापत्रकाचा त्रास सहन करावा लागत. आता ही ट्रेन संभाजीनगरला सकाळी 8:13 वाजता पोहोचेल आणि मुंबई (CSMT) येथे दुपारी 2:25 वाजता येईल. या बदललेल्या वेळांमुळे प्रवासी आणि रेल्वे कार्यकर्ते नाराज आहेत.

रेल्वे कार्यकर्ते अनंत बोरकर यांनी TOI शी बोलताना सांगितले की, हा विस्तार संभाजीनगरच्या आर्थिक वाढीला अडथळा ठरू शकतो, कारण हा भाग औद्योगिक आणि व्यावसायिकदृष्ट्या प्रगती करत आहे. भगवत कराड यांनी रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहून नांदेडसाठी स्वतंत्र वंदे भारत ट्रेन किंवा संभाजीनगर-मुंबई मार्गावर सकाळी लवकर सुटणारी ट्रेन सुरू करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Thursday : गुरुवारी त्रयोदशीला उजळणार, वाचा राशीभविष्य

Harshvardhan jadhav : रावसाहेब दानवे यांच्या जावयाला एका वर्षांचा तुरुंगवास, कारण काय? VIDEO

Hindustani Bhau: कोल्हापूरकरांना हिंदुस्तानी भाऊच्या शिव्या;भाऊला 'वनतारा'चा पुळका

High Court: फ्लॅट आकारनुसार द्यावा लागेल मेंटेनन्स; हायकोर्टाचा मोठा निर्णय

Dada Bhuse: शाळेत राष्ट्रगीतानंतर आता 'गर्जा महाराष्ट्र माझा' राज्यगीत गाणे बंधनकारक

SCROLL FOR NEXT