
अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी
Fake Doctor Exposed in Akola : अकोल्यात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश करण्यात आलाय. या बोगस डॉक्टरकडं ना डिग्री, ना कायद्यानुसार कोणतीही नोंदणी होती. अकोल्यातल्या जुने शहर भागात या बोगस डॉक्टरने दवाखाना उघडून आठ खाटांवर उपचार करीत होता.. अकोला महापालिकेच्या आरोग्य पथकाला याची माहिती लागली.. त्यानंतर या रुग्णालयावर टाकलेल्या छाप्यात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश झालाय. डॉक्टरकडे वैद्यकीय व्यवसायाची पदवी नव्हती व रूग्णालयातील मुंबई नर्सिंग होम अॅक्टनुसार नोंदणीही नसल्याचे पुढे आले. छाप्यात औषर्षीचा साठाही जप्त करण्यात आलाय. मनपाच्या कारवाईमुळे रूग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले आहेत...
वैद्यकीय व्यवसायाची डिग्री नसताना रुग्ण तपासणी व रुग्ण भरती करताना आढळून आला. कुठलीही पदवी तो दाखवू शकला नाही. रुग्णालयात 8 बेड्स टाकलेले होते. त्यापैकी काही बेडवर रुग्णांना आयव्ही सलाईन लावलेले होते. औषधी साठा आणि वैद्यकीय व्यवसायात उपयोगी मशीन व उपकरणे दिसून आली आहेत..
कोणतीही वैद्यकीय शैक्षणिक पदवी नसतानाही रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याचे समोर आले होते. त्यांच्यावर आरोग्य विभागाने कारवाईही केली आहे. महानगरपालिकेच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या माहितीनुसार मनपाच्या पथकाकडून छापा टाकून कथित डॉक्टर विरुद्ध कार्यवाही केली. जावेद शेख, असे याचे नाव आहे. छापा मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आशिष गिहे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुप चौधरी डॉ. विजय चव्हाण सह आदींनी ही कारवाई केली. दरम्यान, जप्त केलेला सीलबंद औषधीसाठा अन्न व औषध प्रशासन विभागाकडं पुढील कारवाईसाठी सुपूर्द केलाय. मात्र डॉक्टरला औषधीसाठा कोणी पुरवला, औषधींचे देयक होते काय, यासह अन्य बाबी आता तपासादरम्यान पुढे येणारेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.