Dhangar reservation hunger strike Saam
महाराष्ट्र

महाराष्ट्र हादरला! १० दिवसांपासून दीपक बोऱ्हाडे धनगर आरक्षणासाठी उपोषणाला मुंबईत, सासऱ्यांनी घरी केली आत्महत्या

deepak borade Dhangar reservation protest : मुंबईमध्ये धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी उपोषणाला बसलेल्या एका उपोषणकर्त्याच्या सासऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रामराव होळकर असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

Namdeo Kumbhar

अक्षय शिंदे पाटील, जालना प्रतिनिधी

deepak borade Dhangar reservation hunger strike Mumbai news : मुंबईमध्ये धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी उपोषणाला बसलेल्या एका उपोषणकर्त्याच्या सासऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव रामराव होळकर असे आहे. त्यांनी आत्महत्या का केली? याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही; पण उपोषणाला बसलेल्या जावयाची प्रकृती खालावल्याने होळकर यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

मागील काही दिवसांपासून मुंबईमध्ये धनगर समाजाकडून आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे. राज्यातील धनगर समाजाचे अनेक लोक मुंबईत दाखल झाले आहेत. यामध्ये जालना जिल्ह्यातील दीपक बोऱ्हाडे यांचाही समावेश आहे. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी दीपक बोऱ्हाडे यांच्याकडून लढा दिला जात आहे. इतर कार्यकर्त्यांसोबतच तेही काही दिवसांपूर्वी मुंबईत आरक्षणाच्या लढ्यासाठी दाखल झाले होते. पण काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत आहे, त्यातच आता त्यांच्या सासऱ्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी दीपक बोऱ्हाडे मुंबईत उपोषणाला बसले आहेत, तर दुसरीकडे जालन्यामध्ये बोऱ्हाडे यांचे सासरे रामराव होळकर यांनी आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, होळकर यांनी आज दुपारी जावई दीपक बोऱ्हाडे यांच्या छत्रपती कॉलनीतील घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाबाबत धनगर समाजात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दीपक बोऱ्हाडे मागील दहा दिवसांपासून मुंबईमध्ये उपोषणाला बसले असून त्यांची प्रकृती खालावत असल्याचे समजते. त्यातच होळकर यांनी आयुष्याचा दोर कापला. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे, पण दीपक बोऱ्हाडे यांची उपोषणादरम्यान खालावत चाललेली तब्येत बघवत नसल्याने होळकर यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा गावात सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण

Viral Video: देशातील एक असं रेल्वे स्टेशन जिथे वर्षातून फक्त दोनदा येते ट्रेन; काय आहे कारण, वाचा

काँग्रेसच्या बड्या नेत्याचे निधन; पक्षाचा अनुभवी चेहरा काळाच्या पडद्याआड! राजकीय वर्तुळात हळहळ

Ram Navami Wishes 2026: रामराज्याची आस, भक्तीचा ध्यास! प्रियजनांना पाठवा रामनवमीच्या'या' खास शुभेच्छा अन् WhatsApp स्टेटसही ठेवा

Kharat Case : भोंदू अशोक खरताचा एन्काऊंटर होणार, राज्यातील दिग्गज नेत्यानं सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT