Navneet Rana and Ravi Rana SAAM TV
महाराष्ट्र

Mumbai News: मोठी बातमी! खासदार नवनीत राणांच्या घरी चोरी, नोकरानेच केला हात साफ; गुन्हा दाखल

Mumbai News: अमरावती लोकसभेच्या खासदार आणि महायुतीच्या उमेदवार नवणीत राणांच्या घरी चोरी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी त्यांच्या बिहारी नोकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Gangappa Pujari

मुंबई, ता. १४ मे २०२४

एकीकडे राज्यात लोकसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरू असतानाच मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमरावती लोकसभेच्या खासदार आणि महायुतीच्या उमेदवार नवणीत राणांच्या घरी चोरी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी त्यांच्या बिहारी नोकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, खासदार नवनीत राणा व रवी राणा यांचे मुंबईच्या खार पश्चिम भागात घर आहे. या घरातून दोन लाखांची रोकड चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीमागे त्यांचा नोकर अर्जुन मुखिया याचा सहभाग असल्याचे उघडकीस आल्याने त्याच्या विरोधात खार पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अर्जुन मुखिया हा बिहारचा रहिवाशी असून तो होळीनिमित्त गावी निघून गेला, मात्र तो अद्याप परत आला नाही. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी खार पोलिसांचे एक विशेष पथक लवकरच बिहारला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, नवणीत राणा या लोकसभेच्या रिंगणात उतरल्या होत्या. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून बळवंत वानखेडे आणि प्रहारचे दिनेश बुब यांचे आव्हान होते. अमरावती लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या असून चार जून रोजी निकाल समोर येणार आहे. त्यामुळे नवणीत राणा पुन्हा एकदा बाजी मारणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ओला दुष्काळ जाहीर करा, अन्यथा नेपाळसारखी अवस्था करू; शेतकरी आक्रमक, सरकारला थेट इशारा

Nanded : फिरायला गेले अन् घात झाला, फोटो काढण्याच्या नादात...; पालकांचा मन हेलावणारा आक्रोश

Maharashtra Live News Update: जमीनमोजणीशिवाय दस्त नोंदणी नाही - चंद्रशेखर बावनकुळे

Asia Cup 2025: आज ओमानविरूद्ध मैदानात उतरणार सूर्या ब्रिगेड; बेंचवरील खेळाडूंना मिळणार संधी?

Ola Uber Fare Hike: ओला- उबरचा प्रवास महागला! भाड्यात मोठी वाढ, प्रवाशांच्या खिशाला फटका

SCROLL FOR NEXT