सचिन गाड, साम टीव्ही मुंबई
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा (Mumbai News) वाढला आहे. या दुर्घटनेत १४ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ४३ जणांवर उपचार सुरू आहेत. अद्यापही ४३ जखमी रुग्णालयात उपचार घेत आहेत. जखमींपैकी एक अत्यवस्थ स्थितीत असल्याची माहिती मिळतेय. आत्तापर्यंत ३१ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आलं आलं आहे.
अवकाळी पावसामुळे (Rain) घाटकोपरमध्ये काल (१३ मे) पेट्रोल पंपावर मोठं होर्डिंग कोसळलं. यामध्ये १५० ते २०० जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे या पंपावरील होर्डिंग खाली कोसळलं होतं. या घटनेमध्ये १४ जण मृत झाले आहेत. मृताचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळल्याची घटना घाटकोपरच्या इस्टर्न एक्स्प्रेस हायवेजवळ घडली आहे.
घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळले,याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस तातडीने पोहोचले होते. त्यांनी तात्काळ बचाव मोहीम सुरू केली होती. काल मुंबईमध्ये अवकाळीचं थैमान पाहायला मिळालं. (Ghatkopar Hording Collapse Update) या पावसामध्ये अनेकांचे बळी गेले आहेत. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढतच आहे. या दुर्घटनेत एकूण ७४ जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. वडाळ्यात देखील वादळी वाऱ्यामुळे काल लिफ्ट कोसळल्याची घटना घडली होती.
होर्डिंग पेट्रोल पंपावर पडल्यामुळे मदत कार्यात अडथळा निर्माण झाला होता. अद्यापही काही जणं अडकल्याची भीती वयक्त केली जात आहे. रात्रभर बचावकार्य सुरू होतं. मुंबई अग्निशमन दलाचे जवान आणि एनडीआरएफ टिमकडून युद्धपातळीवर (Ghatkopar Hording Collapse) बचावकार्य सुरू आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस काल मुंबईत पाहायला मिळाला आहे. मृतांच्या कुटुंबियांना मदत देणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. या होर्डिंगखाली अनेक वाहनं देखील दबली होती. त्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.