घाटकोपर (Ghatkopar) येथील पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळल्याच्या प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दखल घेतली. मुंख्यमंत्र्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या दुर्घटनेत आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला. मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार करणार असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. तसंच, मुंबईतील होर्डिंगचे ऑडिट करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. घटना घडली त्यावेळीच महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्तांना आणि स्टेट डिझास्टर यांना सूचना दिल्या की ताबडतोब रेस्क्यू ऑपरेशन सुरू करा. रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून ५७ लोकांना बाहेर काढले आहे. राजावाडी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आता हॅड्रो आणि क्रेन लावून होर्डिंग उचलण्याचे काम सुरू आहे. जे अडकले आहेत त्यांना बाहेर काढण्याचे काम रेस्क्यू टीम करत आहे. या सर्व अडकलेल्या गाड्या बाहेर काढण्यावर प्राधान्य दिले जात आहे. जखमींवर उपचार करण्याच्या सूचना डॉक्टरांना दिल्या आहेत.'
मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, 'या होर्डिंगबाबत चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पालिका आयुक्ताना होर्डिंगचे स्पेशल आणि स्ट्रक्चर ऑडिट करा. जे विना लायसन्स आणि परवानगी न घेतलेले होर्डिंग्स आहेत त्यांना ताबडतोब फाडून टाका आणि काढून टाका . होर्डिंगधारकांविरोधात गुन्हे दाखल करा आणि कठोर कारवाई करा, अशा सूचना दिल्या आहेत. जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च सरकार करेल. ज्यांचा मृत्यू झालाय त्यांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून केली जाईल. होर्डिंगधारकांना कोणाच्याही जीवाशी खेळण्याचा अधिकार नाही. याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फक्त मुंबईत नाही तर संपूर्ण राज्यात जेवढ्या होर्डिंग्स आहेत त्या सर्व होर्डिंगबाबत सूचना दिल्या आहेत की अशा प्रकारचे कुठलेही होर्डिंग पडू शकतात त्याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.'
दरम्यान, घाटकोपरमध्ये (Ghatkopar) पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ६९ जणांना बाहेर काढण्यात आले असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात (Rajawadi Hospital) उपचार सुरू आहेत. अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्या कंपनीविरोधात मुंबई महानगर पालिकेकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावर सध्या मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. ही घटना सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे हे होर्डिंग कोसळले. हे होर्डिंग अनधिकृत होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.