msrtc cancels bus service from latur maratha reservation andolan saam tv
महाराष्ट्र

Bandh Disrupts ST Bus Services : लातूरहून जाणा-या बस रद्द, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, परभणीसाठीची सेवा बंद

एसटी प्रशासन आणि सरकारने एसटी बसच्या दर्शनी भागातील काचेवर जाळ्या बसवाव्यात. अन्यथा एकही बस काढणार नाही असा निर्धार एसटी बस चालक आणि वाहकांनी केला आहे.

Siddharth Latkar

संदीप भाेसले / विनाेद जिरे

MSRTC News :

मराठा आंदाेलक मनोज जरांगे- पाटील (manoj jarange patil) यांच्या उपोषणाचा आज (शुक्रवार) 7 वा दिवस आहे. जरांगे-पाटील यांच्या आंदाेलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत असून ठिकठिकाणी मराठा समाजाच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव लातूर (Latur Bus Stand) जिल्ह्यातून बाहेरगावी जाणा-या एसटीच्या बस अचानक रद्द करण्यात आल्या आहेत. (Maharashtra News)

राज्य परिवहन महामंडळाने लातूर जिल्ह्यातून बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, परभणी या मार्गावर जाणा-या बस आज सकाळी अचानक रद्द केल्या आहेत. राज्य परिवहन महामंडळाने बसचे नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. दरम्यान या निर्णयामुळे प्रवाशांचे मात्र हाल हाेता पाहयाला मिळत आहे.

बसच्या काचांना जाळी हवी : चालक-वाहकांची मागणी

बीड येथे मराठा आंदोलनाला काहीसे हिंसक वळण लागल्याचे चित्र असतानाच आता बीडमध्ये सुरक्षेच्या प्रश्नावरून एसटी बस चालक वाहक आक्रमक झाले आहेत. आंदोलकाकडून एसटी बस टार्गेट केल्या जात असल्यामुळे आमच्या जीविताचा देखील प्रश्न निर्माण झाला असे चालक वाहकांचे म्हणणे आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बसवर दगडफेक झाल्याने आमचा एसटी बस चालक जखमी झाला आहे. त्यामुळे प्रशासन आणि सरकारने एसटी बसच्या दर्शनी भागातील काचेवर जाळ्या बसवाव्यात. जोपर्यंत जाळ्या बसवणार नाहीत, तोपर्यंत एकही बस आम्ही काढणार नाही असा निर्धार बीड मधील एसटी बस चालक आणि वाहकांनी केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

Ladki Bahin Yojana : 'पोर्टल बंद, नव्या नोंदणी होणार नाहीत'; उद्धव ठाकरेंनी लाडक्या बहिणींचं भविष्यच सांगितलं

Sleep Internship: पुण्याच्या तरुणीने दररोज ९ तास झोप काढून कमावले ९ लाख रुपये; नेमकी नोकरी आहे तरी कोणती?

SCROLL FOR NEXT