MSRTC Bus, buldhana, khamgaon saam tv
महाराष्ट्र

ST Driver Courage : एसटी चालकाचे धाडस पाहून प्रवाशांचे डाेळे पाणावले, 37 जणांचा जीव वाचला (पाहा व्हिडिओ)

MSRTC News : प्रवाशांनी चालकाचे आभार मानले.

संजय जाधव

Buldhana News : मागील आठवड्यात खामगाव आगाराची एसटी बस सप्तश्रुंगी गडाकडे (saptashrungi gad) जात असताना बसचे ब्रेक फेल झाले. त्यानंतर बस 300 फुट खोल दरीत गेली होती. अशीच घटना घडता घडता टळली आहे. चालकाच्या वेळीच ब्रेक फेल झाल्याची बाब लक्षात येताच त्याने तत्काळ बस थांबवली. त्यामुळे पुढली अनर्थ टळल्याने प्रवासी सुखावले. (Maharashtra News)

या घटनेबाबत अधिक माहिती अशी - खामगाव वरून सप्तश्रुंगी गडाकडे जाणारी बस मलकापूर येथे आली. या बसचे ब्रेक अचानक फेल झाले. या बसमध्ये 37 प्रवासी प्रवास करीत होते. ब्रेक फेल झाल्याचे चालक अमोल केणेकर व वाहक कमल वाघ यांच्या लक्षात आले.

बस (bus) सुरु असताना ब्रेक फेल झाल्याचे चालकाच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी चालत्या एसटी मधून बाहेर उडी मारली. रस्त्याकडेला असलेला मोठा दगड आणून चाकाखाली लावला. त्यामुळे एसटी थांबली.

त्यानंतर तात्काळ बसमधील सर्व प्रवाशांना खाली येण्यास सांगितले. प्रवाशांना बसमधून उतरविल्यानंतर पुढे होणारा मोठा अनर्थ टळला. चालकाने एसटी स्थानकात व्यवस्थापकास फोन करुन घटनेची माहिती दिली. त्यानंतर बस टोचन करून कर्मचा-यांकडून डेपोत (msrtc bus) आणण्यात आली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

SCROLL FOR NEXT