Dharashiv Rain Update : धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी सुखावला, प्रशासन का पडले चिंतेत ?

शेतक-यांनी वेऴाेवेळी कृषी विभागाचे देखील मार्गदर्शन घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Dharashiv Rain, farmers,
Dharashiv Rain, farmers, saam tv
Published On

- बालाजी सुरवसे

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यात ४ दिवसांत ५८ तर आतापर्यंत १७८ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान यंदा जुलै संपत आला तरी १०० टक्के पेरणी झाले नसली तरी पेरण्या अंतिम टप्प्यात आल्याचे चित्र आहे. (Maharashtra News)

Dharashiv Rain, farmers,
Koyna Dam Water Level : कोयना धरण व्यवस्थापनाचा नदीपात्रा जवळील गावांना सतर्कतेचा इशारा, आज दुपारी चार वाजता...

धाराशिव जिल्ह्यात उत्तम पाऊस (rain) झाल्याने आता शेतक-यांची चिंता मिटली आहे. बहुतांश शेतकऱ्यांची पावसाअभावी पेरणी रखडली होती. आता पेरणीला वेग आला आहे. ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे त्यांच्यावर दुबार पेरणीची आलेले संकट देखील दुर झाले आहे.

Dharashiv Rain, farmers,
Yavatmal Rain Update : यवतमाळ पूर ओसरला, एक हजार 442 घरांसह अडीच लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान; पालकमंत्री वाडी-वस्त्यांवर

दरम्यान पेरणीयोग्य पाऊस झाला असला तरी जिल्ह्यातील प्रकल्प अद्याप ही कोरडेच असल्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना (farmers) अद्याप ही दमदार पाऊसाची प्रतिक्षा आहे. तसेच प्रशासकीय अधिकारी देखील अधिक पाऊस व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करु लागलेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com