सागर आव्हाड, साम टीव्ही
पुणे : संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाईची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. दिवसेंदिवस या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात अडकत चालला आहे. वाल्मिक कराडला कालच १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली. याच आरोपी वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यानंतर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी संतोष देशमुख प्रकरणावरून ५ प्रश्न उपस्थित केले आहेत.
शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संतोष देशमुख प्रकरणावर भाष्य करत अनेक ५ सवाल उपस्थित केले आहेत. वाल्मिक कराडचे किती खाते सील गेले आहेत. त्याची रक्कम किती आहे, हे काहीच सांगितलं नाही. त्याच्यावर ईडी का लागत नाही? वाल्मिक कराड प्रकरणात खंडणीचे गुन्हे लावले नाही? विष्णू चाटेचा सीडीआर का तपासला नाही? असे सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केले आहेत.
सुप्रिया सुळे यांनी बीड आणि परभणी प्रकरणावरही सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'बीड आणि परभणी या दोन्ही प्रकरणात पीडित कुटुंबांची सुरक्षा महत्वाची आहे. वाल्मिक कराडवर मकोका लावला, त्याबद्दल आम्ही सरकारचे आभार मानतो. उशिरा का होईना, त्यांनी मकोका लावला आहे. 36 दिवस झाले, पण पुढे काय? या प्रकरणात जे कुणी असतील, त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. थेट किवा मागून जे कुणी सहभागी झाले असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे'.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरही सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं. 'धनंजय मुंडे जर कराड कुटुंबियांना भेटले असतील, तर अतिशय गंभीर आहे. त्यांनी नैतिकतेवर राजीनामा दिलाच पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.
'अजित पवारांनी बीडची कार्यकारिणी बरखास्त केली. वाल्मिक कराड हा लाडकी बहीण योजेनचा अध्यक्ष असून ते तपासलं पाहिजे. वाल्मिक कराडने काही शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप त्याचावर आहे.
'बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये ज्या-ज्या शेतकऱ्यांना धमक्या किंवा त्यांचे फसवणूक झाली असेल तर गंभीर आहे. मी तर त्या शेतकऱ्यांशी स्वतः बोलणार आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना देखील सांगणार आहे. मुख्यमंत्री गृहमंत्री आहे, त्यांनाच भेटणार आहे, असेही सुळे यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.