Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, नवीन SIT स्थापन, राज्य सरकारचा निर्णय

Santosh Deshmukh Murder Case : बीड - संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जुने एसआयटी पथक बरखास्त; तर नवे एसआयटी पथकही केले जाहीर...
Santosh Deshmukh
Santosh deshmukh Case Saam tv
Published On

Santosh Deshmukh Murder Case SIT Team : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जुने एसआयटी पथक बरखास्त करण्यात आले आहे. एसआयटी पथकामधील अनेकांवर आरोप करण्यात आले होते. जुन्या एसआयटी पथकातील अधिकाऱ्यांचे फोटो खंडणीतील आरोपी वाल्मीक कराड याच्यासोबत दिसले होते. त्यानंतर त्यावर आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे जूनी एसआयटी बरखास्त करून नवीनची स्थापना केली आहे. त्यामुळे बरखास्त केल्याची चर्चा आहे. जुने एसआयटी पथक बरखास्त केल्यानंतर तात्काळ नवे एसआयटी पथक देखील जाहीर करण्यात आले आहे.

राज्य शासनाने याबाबतचा शासन निर्णय जारी करत याबाबतची माहिती दिली. जुन्या एसआयटी पथकामध्ये ९ अधिकारी कर्मचारी होते, मात्र आता ९ ऐवजी ६ जणांचा समावेश आहे. उप महानिरीक्षक बसवराज तेली हे एसआयटीचे प्रमुख कायम राहणार आहेत.

Santosh Deshmukh
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात ७ आरोपींवर मकोका, वाल्मिक कराड हत्या प्रकरणातील आरोपी नाही

नव्या एसआयटीत कोण असणार ?

किरण पाटील (अपर पोलीस अधीक्षक, राज्य गुन्हा अन्वेषण विभाग, छत्रपती संभाजीनगर)

अनिल गुजर (पोलीस उप अधीक्षक राज्य गुन्हा अन्वेषण विभाग, बीड)

सुभाष मुठे (पोलीस निरीक्षक,राज्य गुन्हा अन्वेषण विभाग, बीड)

अक्षयकुमार ठिकणे (पोलीस निरीक्षक, भरारी पथक, राज्य गुन्हा अन्वेषण विभाग, पुणे)

शर्मिला साळुंखे (पोलीस हवालदार भरारी पथक, राज्य गुन्हा अन्वेषण विभाग, पुणे)

दिपाली पवार (पोलीस हवालदार, सीसीटीएनएस, राज्य गुन्हा अन्वेषण विभाग, पुणे)

Santosh Deshmukh
Santosh Deshmukh Case: वाल्मिक कराडचे पाय खोलात, खंडणी प्रकरणाच्या तपासाला वेग; CID कडून कॉल रेकॉर्डिंगची तपासणी

जुन्या पथकात कोण होते ?

अनिल गुजर - पोलीस उपअधीक्षक, सीआयडी बीड

विजयसिंग शिवलाल जोनवाल स.पो. निरीक्षक, एलसीबी बीड

महेश विघ्ने - पोलिस उपनिरीक्षक, एलसीबी बीड

आनंद शंकर शिंदे- पो.उ.निरीक्षक, केज

तुळशीराम जगताप - सहा. पो. उ. निरीक्षक, एलसीबी बीड

मनोज राजेंद्र वाघ - पोलीस हवालदार, एलसीबी बीड

चंद्रकांत एस.काळकुटे - पोलीस नाईक, केज

बाळासाहेब देविदास अहंकारे - पोलीस नाईक, केज

संतोष भगवानराव गित्ते - पोलीस शिपाई, केज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com