LPG Cylinder : सिलिंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे? ३ स्टेप्स फॉलो करून झटक्यात करा चेक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

युध्दाचा परिणाम

सध्या सुरु असलेल्या अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्या युध्दामुळे दिल्ली ते मुंबईपर्यंत गॅसची टंचाई जाणवत आहे. युध्दामुळे वाढणारे गॅसचे दर तसेच हॉटेल्स बंद होणे आशा अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.

LPG Gas Cylinder | GOOGLE

एलपीजी सिलेंडर

एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्याबाबत अनेकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी गॅस सिलेंडर मिळण्यास उशीर होत आहे.

LPG Gas Cylinder | GOOGLE

घरगुती उपाय

अशा परिस्थितीत जर अचानक स्वयंपाकघरातील गॅस संपला, तर मोठी अडचण निर्माण होऊ शकते. पण गॅस संपण्याआधीच त्यामध्ये किती गॅस शिल्लक आहे ते काही घरगुती उपायांच्या मदतीने जाणून घ्या.

Home Remedies | GOOGLE

पाण्याच्या मदतीने तपासणे

सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे ओळखायचे असेल तर, तुम्ही ते पाण्याच्या मदतीने ओळखू शकता.

Gas cylinder water trick | GOOGLE

कसे करावे?

एका ग्लासमध्ये पाणी घ्या आणि सिलेंडरच्या वरपासून ते खालपर्यंत हळूहळू पाणी ओता. काही सेकंदांनी हाताने सिलेंडरला स्पर्श करून बघा. सिलेंडरचा जो भाग थंड वाटेल, त्या भागापर्यंत गॅस आहे असे समजावे. जर थंड वाटणारा भाग खूप खाली असेल तर समजून घ्या की गॅस लवकरच संपणार आहे.

Water trick | GOOGLE

सिलेंडरच्या वजनावरुन अंदाज लावणे

प्रत्येक सिलेंडरवर त्याचे रिकामे वजन (टॅर वेट) लिहिलेले असते. वजन मोजण्याच्या मशीनवर सिलेडर ठेवून त्याचे वजन बघू शकता. नंतर एकूण वजनातून रिकामे सिलेंडरचे वजन वजा करा. यावरुन तुम्हाला किती गॅस शिल्लक आहे त्याचा अंदाज लावता येईल.

LPG cylinder weight method | GOOGLE

गॅस शेगडीवरुन मिळतो संकेत

सिलेंडरमधील गॅस कमी होऊ लागला की, त्याचा परिणाम शेगडीवर दिसून येतो. गॅसचा फ्लेम कमी झाल्यासारखा वाटत असेल किंवा रंग निळ्या ऐवजी पिवळसर दिसत असेल तर, सिलेंडर लवकरच संपणार असल्याचा संकेत असतो.

Gas Flame | GOOGLE

Kitchen Hacks: जळलेला नॉन स्टिक तवा कसा साफ करावा? फॉलो करा या टिप्स, पुन्हा मिळेल नव्यासारखी चमक

Non Stick Pan Cleaning Tips | GOOGLE
येथे क्लिक करा