NDA Government Cabinet:  Saamtv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: केंद्रातील मंत्रीपदावरुन खदखद! १ खासदार असलेल्यांना कॅबिनेट, शिंदे गटाबाबत दुजाभाव का? श्रीरंग बारणेंचा सवाल!

गोपाल मोटघरे

पिंपरी चिंचवड, ता. १० जून २०२४

देशातील नव्या एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा काल पार पडला. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली. सरकार स्थापन होऊन काही तास उलटले असतानाच एनडीएच्या घटक पक्षांमधील नाराजी चव्हाट्यावर आली आहे. राज्यात शिवसेना शिंदे गटाला एकच मंत्रीपद दिल्याने खासदार श्रीरंग बारणे यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करत भाजपवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले श्रीरंग बारणे?

"काल नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. हे एनडीए सरकार स्थापन होऊन चोवीस तास ही उलटले नाहीत, तोवर एनडीए गटातील खदखद चव्हाट्यावर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला केंद्रीय राज्यमंत्री पद देऊन, दुजाभाव करण्यात आला," असे म्हणत मावळचे नवे खासदार श्रीरंग बारणे यांनी जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली आहे.

"आमच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट पाहता, आम्हाला कॅबिनेट मंत्री पद द्यायला हवं होते. एनडीएमधील इतर घटक पक्षांचे एक-एक खासदार निवडून आलेत, मात्र त्यांना कॅबिनेट मंत्री पद दिले गेले. मग शिंदे गटाबाबत भाजपने हा दुजाभाव का केला? असा सवाल श्रीरंग बारणे यांनी उपस्थित केला आहे.

तसेच "कुटुंबाविरोधात जाऊन महायुतीत आलेल्या अजित पवारांना ही एक मंत्री पद द्यायला हवं होतं. भाजपने साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलेंना ही मंत्री पद द्यायला हवं होते, असं म्हणत बारणेंनी सगळी खदखद बोलून दाखवली आहे. त्यामुळे एनडीए सरकार स्थापन होऊन सुरळित कारभार सुरू होण्याआधीच वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT