Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं? मंत्रिमंडळावरून संजय राऊतांनी CM शिंदे, अजित पवारांना डिवचले; म्हणाले...

Maharashtra Politics Breaking News: "हे मोदी सरकार किंवा भाजपचे सरकार नाही. आत्तापर्यंत, मोदी सरकार, अबकी बार, मोदी है तो मुमकीन है,सबकुछ मोदी, काल ते चित्र नव्हते, असे म्हणत संजय राऊत यांनी नव्या एनडीए सरकारवर हल्लाबोल केला.
Sanjay Raut News: महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं? मंत्रीमंडळावरुन संजय राऊतांनी शिवसेना शिंदे गट, अजित पवारांना डिवचले; म्हणाले...
Sanjay Raut vs Ajit PawarSaam TV

मयुर राणे| मुंबई, ता. १० जून २०२४

लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवलेल्या एनडीए सरकारचा काल शपथविधी सोहळा पार पडला. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. नव्या एनडीए सरकारमध्ये राज्यातील ६ खासदारांची वर्णी लागली असून अजित पवार गटाला मात्र मंत्रीपद मिळाले नाही. यावरुनच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे अन् अजित पवार गटावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

"हे एनडीएचे सरकार आहे, मोदींचे नाही. अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट भारतीय जनता पक्षाकडे आश्रयाला आहेत. त्यांना स्वाभिमान असता तर राज्यमंत्रीपद धुडकावले असते. हे कॅबिनेट मंत्रीपदही किती दिवस टिकेल माहित नाही. काल ते शपथ घेत असताना काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ला होत होता. तुम्हाला काश्मिर, जम्मू काश्मिरची चिंता नाही. फक्त सरकार चालवायचे आहे," असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

"हे मोदी सरकार किंवा भाजपचे सरकार नाही. आत्तापर्यंत, मोदी सरकार, अबकी बार, मोदी है तो मुमकीन है,सबकुछ मोदी, काल ते चित्र नव्हते. दोन बाबू महत्वाचे आहेत. या टेकुंचा इतिहास सर्वांना माहित आहे. पण महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं? पियुष गोयल शेअर मार्केट वाल्यांचे मंत्री आहेत, अजित दादांच्या वाट्याला भोपळाच आहे, अन् नकली शिवसेनेच्या तोंडावर एक राज्यमंत्रीपद फेकले," अशी टीकाही राऊतांनी केली.

Sanjay Raut News: महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं? मंत्रीमंडळावरुन संजय राऊतांनी शिवसेना शिंदे गट, अजित पवारांना डिवचले; म्हणाले...
Maharashtra Politics: ब्रेकिंग! 'शिवसेना शिंदे गट, अजित पवार गटातील ४० आमदारांची घरवापसी होणार', काँग्रेस नेत्याचा सर्वात मोठा दावा!

"प्रफुल पटेलांची १५० कोटींची प्रॉपर्टी ईडीने परत केली. केस परत घेतली, मगं मंत्रीपद कशाला पाहिजे. काल शपथविधी घेत असताना काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ला झाला, १० जणांचा बळी गेला. त्यावर पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी काहीच बोलले नाहीत. शपथ घेतली पण लोकांमध्ये उत्साह नाही. भाजपला बहुमत नाही, मोदींचा मुखवटा फाटला. हे ओढून ताणून जबरदस्तीने आणलेलं सरकार आहे, असा घणाघातही संजय राऊतांनी केला.

Sanjay Raut News: महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं? मंत्रीमंडळावरुन संजय राऊतांनी शिवसेना शिंदे गट, अजित पवारांना डिवचले; म्हणाले...
NDA Government: नारायण राणेंचा केंद्रीय मंत्रिमंडळातून पत्ता कट; भागवत कराड यांनाही डच्चू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com