Modi Cabinet 2024: मोदी सरकारमधील सर्वात श्रीमंत मंत्री; ४८ वर्षीय चंद्र शेखर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, संपत्ती वाचून म्हणाल...

Chandra Sekhar Pemmasani:: मोदी सरकारमधील ४८ वर्षीय चंद्र शेखर पेम्मासानी यांची सर्वत्र चर्चा होत आहे. त्यांची एकूण संपत्ती ५००० कोटींहून अधिक आहे.
मोदी सरकारमधील सर्वात श्रीमंत मंत्री; ४८ वर्षीय चंद्र शेखर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, संपत्ती वाचून म्हणाल...
Modi Cabinet 2024Saam tv

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या नव्या मंत्र्यांनी रविवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत शपथ घेतली. मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळातील तेलुगू देसम पक्षातील ४८ वर्षीय चंद्र शेखर पेम्मासानी यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. चंद्रशेखर पेम्मासानी हे नव्या मंत्रिमंडळातील सर्वात श्रीमंत मंत्री आहेत.

चंद्र शेखर पेम्मासानी हे आंध्रप्रदेशच्या गुटूंर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यांनी ३ लाख ४० हजार मतांच्या फरकाने विरोधी उमेदवाराला धूळ चारली. चंद्रशेखर पेम्मासानी हे ५ हजार ७०० कोटी रुपयांचे मालक आहेत.

मोदी सरकारमधील सर्वात श्रीमंत मंत्री; ४८ वर्षीय चंद्र शेखर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, संपत्ती वाचून म्हणाल...
Modi government 3.0: कोण आहेत सर्वाधिक मते मिळवणारे 10 नेते, मोदी 3.0 कॅबिनेटमध्ये कोणाला मिळाली संधी?

कोण आहेत चंद्र शेखर पेम्मासानी?

आंध्रप्रदेशच्या गुटूंरच्या बुर्लिपलेम गावात जन्माला आलेले चंद्रशेखर पेम्मासानी यांनी उस्मानिया विद्यापिठातून एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर जॉन्स हॉपकिन्स विद्यापिठाच्या रुग्णालयात ५ वर्ष काम केलं. तसेच त्यांनी विद्यापिठातील विद्यार्थ्यांना शिकवण्याचंही काम केलं.

मोदी सरकारमधील सर्वात श्रीमंत मंत्री; ४८ वर्षीय चंद्र शेखर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, संपत्ती वाचून म्हणाल...
BJP New President: जेपी नड्डा यांचा मोदी मंत्रिमंडळात समावेश, कोण होणार नवीन भाजप अध्यक्ष? विनोद तावडे यांच्या नावाची चर्चा

४८ वर्षीय पेम्मासानी एक ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म यूवर्ल्डचे संस्थापक आणि सीईओ आहेत. पेम्मासानी हे टीडीपीच्या एनआरआय सेलच्या दिर्घकाळापासून सक्रिय होते. अमेरिकेत राहताना त्यांनी पक्षातील अनेक कार्यक्रमाचे आयोजनही केले आहे.

केंद्रीय मंत्री चंद्र शेखर पेम्मासानी यांनी २०२० साली अमेरिकेत एक युवा उद्योजक म्हणून 'अर्न्स्ट एंड यंग अवार्ड' जिंकला. त्यांनी पेम्मासानी फाउंडेशनची स्थापना केली आहे. त्यांनी गुटुंर आणि नरसरावपेट गावातील लोकांसाठी आरोग्य शिबीर आणि पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले आहे. या कामामुळे त्यांची लोकसभा मतदारसंघात चर्चा होऊ लागली. या कामाच्या आधारावर लोकांमध्ये त्यांना प्रसिद्धी मिळाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com