Share Market Update: गुडन्यूज! मोदी सरकारच्या शपथविधीनंतर शेअर बाजारात वारं फिरलं; सेन्सेक्स सुसाट, निफ्टीनेही घेतली उसळी

Stock Market After PM Narendra Modi Oath Ceremony: मोदी सरकारच्या शपथविधीनंतर शेअर मार्केटमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
शेअर मार्केटमध्ये उत्साहाचं वातावरण
Share Market Update Saam Tv
Published On

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रविवारी देशात पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन झालं आहे. ९ जून रोजी राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यानंतर आज शेअर बाजारात तेजी दिसत आहे. सेन्सेक्सने प्रथमच ७७,००० चा टप्पा पार केला आहे. देशात एनडीए सरकार सत्तेवर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. शेअर बाजारानेही आज मोदींच्या तिसऱ्या शपथविधीला सलाम करत इतिहास रचल्याचं दिसतंय.

आठवड्याच्या पहिल्या दिवशी आज (१० जून) बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या ३० शेअर्सच्या सेन्सेक्सने ३२३.६४ अंकांच्या मजबूत वाढीसह प्रथमच ७७,००० चा टप्पा ओलांडला आहे. ते ७७, ०१७ च्या पातळीवर उघडले (Share Market Update) आहेत. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी निर्देशांकानेही बाजार उघडल्यानंतर १०५ अंकांची उसळी घेतली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी मजबूत वाढीसह बंद झाले होते.

शेअर बाजारातील वाढ:

बीएसई सेन्सेक्स (७ जून) १६१८.८५ अंकांच्या २.१६ टक्क्यांच्या वाढीसह ७६,६९३.४१ वर बंद झाला होता. शेअर बाजारातील वाढ गेल्या शुक्रवारीही कायम राहिली होती. शेअर बाजार ७७, ०१७ च्या पातळीवर उघडल्यानंतर सेन्सेक्सने आणखी गती घेतली होती. सेन्सेक्स ७७,०७९.०४ च्या पातळीवर पोहोचला होता. ही बीएसई निर्देशांकाची नवीन सर्वकालीन उच्च पातळी (Stock Market After PM Narendra Modi Oath Ceremony) आहे.

शेअर मार्केटमध्ये उत्साहाचं वातावरण
Share Market Opening: निकाल लागल्यानंतर बाजार सावरला; कालच्या भुकंपानंतर सेन्सेक्समध्ये ६०० अंकांची वाढ

कोणत्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी?

बाजारात व्यवहार सुरू होताच सुमारे २१९६ कंपन्यांचे शेअर्स तेजीत (Sensex) उघडले, तर ४५२ कंपन्यांचे शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. १४८ समभागांच्या स्थितीत कोणताही बदल झालेला नाही. सुरुवातीच्या व्यापारात, अदानी पोर्ट्स, पॉवर ग्रिड कॉर्प, बजाज ऑटो, कोल इंडिया आणि श्रीराम फायनान्सच्या शेअर्समध्ये निफ्टी (Nifty) निर्देशांकात मोठी वाढ झाली. याउलट टेक महिंद्रा, इन्फोसिस, डॉ रेड्डीज लॅब्स, एलटीआय माइंडट्री आणि हिंदाल्को यांच्या समभागांमध्ये घसरण झाली आहे.

शेअर मार्केटमध्ये उत्साहाचं वातावरण
Rahul Gandhi Share Market : मोदी-शहांनी शेअर खरेदी करायला का सांगितलं? गांधीचा सवाल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com