Share Market Opening: निकाल लागल्यानंतर बाजार सावरला; कालच्या भुकंपानंतर सेन्सेक्समध्ये ६०० अंकांची वाढ

Sensex Increased By 600 After Election Result | काल झालेल्या मोठ्या घसरणीनंतर आज बाजार थोडा सावरल्याचं दिसत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी काही अंकांनी वाढला आहे.
Share Market Opening: निकाल  लागल्यानंतर बाजार सावरला; कालच्या भुकंपानंतर सेन्सेक्समध्ये ६०० अंकांची वाढ
Sensex Increased By 600Saam TV

काल लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात होताच शेअर बाजारात मोठा राजकीय भूकंप झाला. या भूकंपाने अनेक गुंतवणूकदारांचं नुकसान झालं. काल झालेल्या मोठ्या घसरणीनंतर आज बाजार थोडा सावरल्याचं दिसत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी काही अंकांनी वाढला आहे.

Share Market Opening: निकाल  लागल्यानंतर बाजार सावरला; कालच्या भुकंपानंतर सेन्सेक्समध्ये ६०० अंकांची वाढ
Special Report : Share Market जगात पुन्हा हर्षद मेहता घोटाळ्याची पुनरावृत्ती होणार?

सेन्सेक्समध्ये आज ६०० हून अधिक अंकांची वाढ झाली आहे. तर निफ्टी देखील २०० अंकांहून अधिक वाढला आहे. कोव्हीड काळात बाजार सर्वाधिक अंकांनी कोसळला होता. त्यानंतर आता पुन्हा 2024 लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी बाजारात मोठा भूकंप पाहायाल मिळाला.

निकालाचे चित्र स्पष्ट झाले, सर्व आकडे जाहीर झाले त्यानंतर आज बाजारात पुन्हा तेजी दिसून आली आहे. काल एफआयआयने रोख आणि निर्देशांक फ्युचर्समध्ये तब्बल २२,००० कोटी रुपयांची विक्री केली आहे.

बीएसई लिस्टेड कंपन्यांच्या मार्केट कॅपमधून काल ३१ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. ट्रिगर्समध्ये आज सकाळी गिफ्ट निफ्टी १५० अंकांची ताकदीमध्ये दिसला. तर दुसरीकडे अमेरिकन फ्युचर्स बाजारात तेजी दिसली. डाऊ फ्युचर्समध्ये ७० अंकांची तेजी आणि निक्केईमध्ये ४० अंकांची घसरण दिसली आहे.

Share Market Opening: निकाल  लागल्यानंतर बाजार सावरला; कालच्या भुकंपानंतर सेन्सेक्समध्ये ६०० अंकांची वाढ
Share Market : मोठी बातमी! सेन्सेक्स तब्बल ५००० अंकांनी कोसळला; गुंतवणुकदारांचे २० मिनिटातच २० हजार कोटी बुडाले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com