Breaking News: PM मोदींनी पदभार स्वीकारताच शेतकऱ्यांसाठी पहिला मोठा निर्णय, बळीराजाला दिलं २०,००० कोटींचं गिफ्ट

PM Narendra Modi Takes Charge First decision of the NDA Government: देशाचे नवे पंतप्रधान म्हणून आज नरेंद्र मोदी यांनी पदभार स्विकारला. पदभार स्विकारल्यानंतर पंतप्रधानांनी शेतकऱ्यांसाठी मोठे गिफ्ट दिले. काय आहे एनडीए सरकारचा पहिला निर्णय? वाचा...
Breaking News: PM मोदींनी पदभार स्विकारला! पहिली सही शेतकऱ्यांसाठी;  बळीराजाला दिलं २० हजार कोटींच गिफ्ट
Breaking News:Saamtv

दिल्ली, ता.| १० जून २०२४

देशाचे नवे पंतप्रधान म्हणून आज नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पहिलाच मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतला आहे. पंतप्रधान किसान निधीच्या १७ व्या हप्त्याला मंजुरी दिली. पंतप्रधानांनी आज पदभार स्वीकारताच निधी मंजुरीच्या फाइलवर पहिली सही केली. २० हजार कोटींच्या निधीला मंजुरी दिली असून, याचा थेट फायदा ९.३ कोटी शेतकऱ्यांना होणार आहे.

NDA सरकारचा पहिला निर्णय!

देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली. काल एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यालयात पदभार स्विकारला. तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान निधीच्या 17 व्या हप्त्याला मंजुरी देणाऱ्या फाईलवर सही केली. यामुळे 9.3 कोटी शेतकऱ्यांना फायदा होईल आणि सुमारे 20,000 कोटी रुपयांचे वाटप होईल.

किसान कल्याणासाठी वचनबद्ध...

“किसान कल्याणसाठी आमचे सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे. त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर स्वाक्षरी केलेली पहिली फाईल शेतकरी कल्याणाशी संबंधित आहे. आम्हाला पुढील काळात शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करायचे आहे, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com