Narendra Modi oath ceremony LIVE : मोदींच्या मंत्रिमंडळातील ७२ मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची घेतली शपथ

Narendra Modi oath ceremony LIVE 2024 Updates : नरेंद्र मोदी आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. राष्ट्रपती द्रौपती मुर्मू सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी मोदींना शपथ देतील.
 Narendra Modi oath ceremony LIVE
Narendra Modi oath ceremony LIVESaam Digital

India PM Oath Ceremony Live : मोदींच्या मंत्रिमंडळातील ७२ मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची घेतली शपथ

मोदींच्या मंत्रिमंडळातील ७२ मंत्र्यांनी आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली असून नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा देशाची सूत्र हाती घेतली आहेत. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांनी शपथ दिली. अमित शहा, नितीन गडकरी, राजनाथ सिंह, निर्मला सीतारामन या भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनीही आज शपथ घेतली असून त्यांचीही सलग तिसऱ्यांदा मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Narendra Modi oath ceremony LIVE : नितीन गडकरींसह 'या' नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पीयुष गोयल, मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलीय.

India PM Oath Taking : हरियाणाचे खासदार राव इंद्रजित सिंग यांना राज्यमंत्रीपद, राष्ट्रपतींनी दिली गोपनीयतेची शपथ

राव इंद्रजित सिंग यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ते गुरुग्राम, हरियाणाचे खासदार आहेत. मोदी सरकारमध्ये ते दोनदा मंत्री राहिले आहेत. तो भाजपचा ओबीसी चेहराही आहेत.

India PM Oath Ceremony Live : गुजरातचे लोकप्रिय नेते सी.आर. पाटील यांना केंद्रीय मंत्रिमंडळात जबाबदारी

सीआर पाटील यांनी केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. ते गुजरातच्या नवसारी मतदारसंघातून भाजपचे खासदार आहेत. सीआर पाटील हे गुजरातमधील सर्व वर्गांमध्ये लोकप्रिय मानले जातात.

India PM Oath Taking :  एलजेपी प्रमुख चिराग पासवान यांना केद्रींय मंत्रिपदाची जबाबदारी

एलजेपी प्रमुख चिराग पासवान यांना मोदींच्या मंत्रिमंडळात जबाबदारी देण्यात आली आहे. ते बिहारमधील हाजीपूरचे खासदार म्हणून निवडून आले आहेत. ५ जागांवर त्यांनी निवडूक लढवली असून पाचही जागांवर त्यांच्या पक्षाचा विजय झाला आहे. निवडणुकीत त्यांनी संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं होतं.

India PM News : तेलंगणाचे खासदार जी. किशन यांना राष्ट्रपतींनी दिली गोपनीयतेची शपथ

तेलंगणातील सिकंदराबादचे खासदार जी किशन रेड्डी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. ते तेलंगणात भाजपचे अध्यक्ष असून आधीच्या मोदी सरकारमध्ये मंत्रीही राहिले आहेत.

India PM News : राज्यसभा खासदार हरदीप सिंग पुरी यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

हरदीप सिंग पुरी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. ते भाजपचे एक मोठा शीख चेहरा आहेत. मोदी सरकारमध्ये ते दोनदा मंत्री राहिले असून उत्तर प्रदेशमधून राज्यसभेचे खासदार आहेत.

India PM Oath Ceremony Live : ईशान्य भारतातील मोठे नेते किरेन रिजिजू यांना पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान

किरेन रिजिजू यांनी कॅबिनेट मंत्रिपदाच्या गोपनीयतेची आज शपथ घेतली. रिजिजू 2004 मध्ये पहिल्यांदा खासदार झाले. ते ईशान्येच्या राजकारणातील एक मोठा चेहरा आहेत. अरुणाचल प्रदेशातून रिजिजू सलग तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत.

India PM Oath Taking : झारखंडच्या खासदार अन्नपूर्णा देवी यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

अन्नपूर्णा देवी यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. त्या झारखंडमधील कोडरमा येथून खासदार आहेत. मोदी सरकारमध्ये त्या शिक्षण राज्यमंत्रीही होत्या. ओबीसी समाजाच्या त्या लोकप्रिय नेत्या आहेत.

India swearing-in ceremony: रामदास आठवले यांना तिसऱ्यांदा केंद्रात मंत्रिपद, राष्ट्रपतींनी दिली गोपनीयतेची शपथ

आरपीआयचे (आठवले गट) नेते रामदास आठवले यांना तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. आज त्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

India PM News : राजस्थानचे लोकप्रिय नेते गजेंद्र सिंह शेखावत यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

राजस्थानच्या जोधपूर मतदारसंघाचे खासदार आणि तरुण आणि शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय असलेले गजेंद्र सिंह शेखावत यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ. केंद्रात ते जलशक्ती मंत्री राहिले आहेत.

India PM Oath Ceremony Live : राजस्थानच्या भूपेंद्र यादव यांना मोदींच्या मंत्रिमंडळात संधी

भूपेंद्र यादव यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. ते राजस्थानमधील अलवर मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले असून पक्षाचा ओबीसी चेहरा आहेत. यापूर्वीच्या मोदी सरकारमध्येही ते ओबीसी चेहरा राहिले आहेत.

India PM Oath Taking : ज्योतिरादित्य सिंधिया यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

ज्योतिरादित्य सिंधिया यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ते मध्य प्रदेशातील गुना मतदारसंघाचे खासदार आहेत. यापूर्वीच्या मोदी सरकारमध्ये त्यांनी नागरी विमान वाहतूक मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली आहे.

India swearing-in ceremony: अश्विनी वैष्णव यांना पुन्हा कॅबिनेट मंत्रिपदाची संधी, राष्ट्रपतींनी दिली गोपनीयतेची शपथ

अश्विनी वैष्णव यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ. ते स्वच्छ प्रतिमेचे नेते मानले जातात, मागील मोदी सरकारमध्ये ते रेल्वे आणि दळणवळण मंत्री राहिले आहेत. ओडिशातून राज्यसभेचे खासदार आहेत.

 India PM News : बुलढाण्याचे शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

 बुलढाण्याचे शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. एकनाथ शिंदे गटाला केंद्रात एक कॅबिनेटमंत्रीपद देण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील ६ मंत्र्यामध्ये त्यांचाही समावेश आहे.

India PM Oath Ceremony Live : बेगुसरायचे खासदार गिरिराज सिंह यांनी घेतली गोपनीयचेची शपथ

गिरिराज सिंह यांना राष्ट्रपतींनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ दिली. ते 71 वर्षांचे आहेत. गिरीराज सिंह हे बिहारमधील बेगुसराय मतदारसंघाचे खासदार आहेत.

India swearing-in ceremony: ओडिशाच्या जुआल ओराव यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

जुआल ओराव यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ. ते सुंदरगड, ओडिशाचे खासदार आहेत.

 India PM News : प्रल्हाद जोशी यांना पुन्हा मंत्रिपदाची जबाबदारी, ५ वेळा खासदार

प्रल्हाद जोशी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाच्या गोपनियतेची शपथ घेतली. कर्नाटकातील धारवाडमधून ते निवडणूक जिंकले असून 5 वेळा खासदार राहिले आहेत. मागील सरकारमध्ये त्यांनी संसदीय कामकाज मंत्रिपद भूषवले होते.

India PM Oath Taking :  राममोहन नायडू यांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान

टीडीपीचे राम मोहन रायडू यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची आज राष्ट्रपती भवनात शपथ घेतली. 2014 मध्ये वयाच्या 27 व्या वर्षी ते पहिल्यांदा खासदार झाले. चंद्राबाबू हा नायडूंच्या युवा ब्रिगेडचा सर्वात आश्वासक चेहरा आहेत.

India PM Oath Ceremony Live : डॉ. वीरेंद्र कुमार यांनी पद आणि गोपनीयतेची घेतली शपथ

डॉ. वीरेंद्र कुमार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

India swearing-in ceremony: सर्बानंद सोनोवाल यांनी घेतली गोपनीयतेची शपथ

सर्बानंद सोनोवाल यांना पुन्हा मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. त्यांनी आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली

India PM Oath Taking :  राजीव रंजन सिंगयांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान, गोपनीयतेची घेतली शपथ

राजीव रंजन सिंह उर्फ ​​लालन सिंह यांनी केंद्रीय मंत्रिमंपदाच्या गोपनीयचेची शपथ घेतली आहे.

India PM Oath Ceremony Live : बिहारमध्ये निवडणुकीत महत्त्वाची जबाबदारी पार पाडलेल्या जीतनराम मांझी यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

बिहारचे महत्त्वाचे नेते जीतनराम मांझी यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. ते हिंदुस्थान अवाम मोर्चाचे अध्यक्ष आहेत.

India swearing-in ceremony: धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली केंद्रीय मंत्रीपदाची शपथ

धर्मेंद्र प्रधान यांना मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. धर्मेंद्र प्रधान यांना राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांनी आज पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

India PM Oath Ceremony Live :  पियुष गोयल यांना राष्ट्रपतींनी दिली गोपनीयतेची शपथ

पीयूष गोयल यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. गोयल हे तीन वेळा राज्यसभा सदस्य होते. यावेळी मुंबईतून ते मोठ्या मताधिक्याने लोकसभेच्या निवडणुकीत निवडून आले आहेत.

India swearing-in ceremony:  एस. जयशंकर यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली

एस जयशंकर यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. ते गुजरातमधून राज्यसभेचे खासदार आहेत. जयशंकर यांच्यावर मागील सरकारमध्ये परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी होती.

India PM Oath Taking : एचडी कुमारस्वामी यांनी घेलती कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

जेडीएस प्रमुख एचडी कुमारस्वामी यांनी आज कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. कुमारस्वामी हे दोनदा मुख्यमंत्री राहिले आहेत. यावेळी ते कर्नाटकातील मंड्या मतदारसंघातून खासदार झाले आहेत.

India PM Oath Ceremony Live : मनोहरलाल कट्टर यांना पहिल्यांदा मंत्रिपदाची संधी, राष्ट्रपतींनी दिली शपथ

मनोहर लाल खट्टर यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रपतींनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. खट्टर हे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आहेत.

India swearing-in ceremony: निर्मला सीतारामन यांना राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांनी दिली मंत्रिपदाची शपथ 

निर्मला सीतारामन यांना दुसऱ्यांदा मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळाले आहे. सीतारामन यांनी आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. मोदींच्या मंत्रिमंडळात त्या अर्थमंत्री होत्या. यावेळी त्यांना कोणती जबाबदारी मिळते हे पाहणं महत्त्वाचं आहे.

India PM Oath Taking : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. शिवराज सिंह चौहान हे पाचवेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. शिवराज सिंह यांनी विदिशा मतदारसंघातून विक्रमी मतांनी विजय मिळवला होता. ते आतापर्यंत 4 वेळा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत.

India swearing-in ceremony: भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पहिल्यांदाच घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ

जेपी नड्डा यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. नड्डांनाही मोदींच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं आहे. भाजपचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.

India PM Oath Ceremony Live :  भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी राष्ट्रपती भवनात घेतली मंत्रिपदाची शपथ

नितीन गडकरी यांनीही सलग तिसऱ्यांदा मोदींच्या मंत्रिमंडळात गोपनीयतेची शपथ घेतली आहे.

PM modi oath ceremony : राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांनी दिली अमित शहा यांना मंत्रिपदाची शपथ

अमित शहा यांना राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांनी मंत्रिपदाची शपथ दिली. गेले १० वर्ष त्यांच्याकडे गृहमंत्रीपद आहे. यावेळी त्यांना कोणतं खातं देणार याची देशाला उत्सुकता आहे.

India swearing-in ceremony: राजनाथ सिंह यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

राजनाथ सिहं यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली. मागच्या सरकारमध्ये त्यांच्याकडे संरक्षणमंत्रीपद होत.

India PM Oath Taking : नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधान पदाची शपथ, राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांनी दिली शपथ

नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली असून हा एक ऐतिहासिक दिवस आहे. पं. जवाहरलाल नेहरू यांच्या नंतर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे स्वतंत्र्य भारताचे दुसरे पंतप्रधान ठरले आहेत.

India PM Oath Ceremony : शपथविधी सोहळ्यासाठी मोदी पोहोचले, तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ

केंद्रात एनडीच सरकार बनत असून शपथविधी सोहळ्याला नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनात दाखल झाले आहेत. थोड्यात वेळात ते तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या सोहळ्याला अमित शहा, राजनाथ सिंह, निर्मला सीतारामन, नितीन गडकरी, जे. पी. नड्डा यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित आहे.

India PM Swearing In Ceremony : मोदींच्या शपथविधीला बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना, मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांची उपस्थिती

नरेंद्र मोदींच्या शपथविधीला बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना, श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, भूटानचे पंतप्रधान शेरिंग टोबगे, सेशेल्सचे उपराष्ट्रपती अहमद अफीफ, नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दाहाल, मालदीवचे राष्ट्राध्यश्र मोहम्मद मुइज्जू यांनी हजेरी लावली आहे.

PM modi oath ceremony: पंतप्रधान मोदींचा माझ्यावरचा विश्वास खूप महत्त्वाचा : चिराग पासवान

एलजेपी (रामविलास) प्रमुख चिराग पासवान म्हणाले, ''आजचा दिवस माझ्यासाठी मोठा आहे, मला एक मोठी जबाबदारी मिळणार आहे. पंतप्रधान मोदींचा माझ्यावरचा विश्वास माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मी माझ्या मेहनतीने आणि क्षमतेने लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन.''

India PM Oath Taking : मोदींच्या शपथविधीला मुकेश अंबानी, शाहरुख खानची हजेरी

राष्ट्रपती भवनात थोड्याच वेळात नरेंद्र मोदी आणि ४३ मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. या शपथविधी सोहळ्याला उद्योगपती मुकेश अंबानी, अभिनेता शाहरुख खान, कंगना रनौत, अक्षय कुमार यांनी हजेरी लावली आहे.

India PM Oath Ceremony Live : काही दिवसात आमचे चार खासदार होतील, त्यामुळे १ मंत्रिपद हवंच; अजित पवार

राष्ट्रवादीचे काही महिन्यात राज्यसभेचे ३ खासदार होणार आहेत. लोकसभेतील १ खासदार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे ४ चार खासदार होतील. त्यामुळे किमान १ मंत्रिपद मिळावं ही आपली इच्छा असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. आम्ही NDA चे मित्र पक्ष म्हणून कार्यक्रमाला जात असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

List of 2024 new cabinet minister of India : मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून ६ जणांचा समावेश, बिहारला ८ तर उत्तर प्रदेशला ९ मंत्रिपद

केद्रात एनडीए सरकार स्थापन करत असून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचाही शपथविधी पार पडणार आहे. राष्ट्रपती द्रौपती मुर्मू सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी मोदी आणि मंत्र्यांना शपथ देतील. पहिल्या यादीत ४३ जणांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात महाराष्ट्रातील ६ जणांचा समावेश आहे. बिहारमधील ८ जणांना तर उत्तर प्रदेशमधील ९ जणांना मंत्रिपद देण्यात आली आहेत. गुजरातला ६ आणि कर्नाटकला ५ जणांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. गोव्यालाही १ मंत्रिपद देण्यात आलं आहे. महाराष्ट्रातून नितिन गडकरी, रामदास आठवले, पियुष गोयल, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ आणि प्रतापराव जाधव यांंना मंत्रिपद देण्यात आलं आहे.

'स्वप्नातही वाटलं नव्हत मंत्रिपद मिळेल', मुरलीधर मोहोळ यांची पहिली प्रतिक्रिया

पुणेकरांची जशी सेवा केली तशी देशाची सेवा करायची आहे

स्वप्नातही वाटलं नव्हत मंत्रिपद मिळेल अस... पण अचानक फोन आला आणि सांगितल तुम्हाला शपथ घ्यायची आहे

मोदींनी आज मार्गदर्शन केलं... सगळे नव्याने मंत्री बनणारे उपस्थित होते... आगामी काळात काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत

चांगल काम करून पुण्याचं नाव करू

प्रफुल पटेलांना राज्यमंत्रीपद नाही, भविष्यात विचार होईल : देवेंद्र फडणवीस 

राष्ट्रवादीला १ जागा देण्यात आली होती. प्रफुल पटेल यांचं नाव फायनल केलं होतं. पण ते कॅबिनेट मंत्री राहीले आहेत. त्यांना राज्यमंत्री करता येणार नाही, असं त्यांचं मत होतं. पण भविष्यात त्यांचा विचार होईल.

आता अयोध्येत होणार महाराष्ट्र सदन

अयोध्येतील शरयू नदी जवळ 2 एकर जागा देण्यास उत्तर प्रदेश सरकारची मंजुरी देण्यात आलीय. महाराष्ट्र सदनसाठी राज्य सरकारने विनंती केली होती. मंत्री रवींद्र चव्हाण यांनी माहिती दिली होती.

नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने पुण्यात जल्लोष

पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांची केंद्रीय मंत्री पदी निवड झाल्याबद्दल पुणे शहर भाजपच्यावतीने विजयोत्सव केला जाणार आहे. संध्याकाळी ६ वाजता विजयोत्सव साजरा केला जाणार आहे.

अजित पवारांच्या दोन खासदारांमध्ये मंत्रिपदावरून वाद? फडणवीसांनी मध्यस्थी केल्याची माहिती

अजित पवार गटातील दोन खासदारांमध्ये मंत्रिपदावरून वाद झाल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे. प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यात वाद झाल्याचं कळतंय. लोकसभेतून निवडून येणाऱ्या खासदाराला मंत्रिपद मिळावं अशी काही कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची इच्छाआहे.

तर प्रफुल पटेल हे केंद्र पातळीवरचे नेतृत्व असल्याने त्यांनीच मंत्री व्हावं अशी दुसऱ्या गटाची इच्छा आहे. दोघांच्या वादात राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणारे मंत्रीपद थांबल्याची माहिती आहे. सध्या फडणवीसांकडून दोन्ही नेत्यांची मनधरणी सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

खबांटकी घाटात ट्रक उलटला, वाहतुक खोळंबली

सातारा येथील खंबाटकी घाटातील दत्त मंदिर जवळ ट्रक बंद पडला आहे. त्यामुळे सकाळी साडेआठ वाजल्यापासून खंबाटकी घाट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. परिणामी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. खाजगी क्रेन बोलवून ट्रक बाजूला काढायचे काम सुरू आहे.

ठेकेदाराचा अजब प्रकार, भरपावसात रस्त्यावर डांबरीकरण

कोल्हापूर महानगरपालिकेच्या रस्ते ठेकेदारांचा आणखी एक नवा प्रताप कोल्हापूरकरांना पाहायला मिळालेला आहे. या ठेकेदाराने चक्क भर पावसात रस्त्याचे डांबरीकरण केल्याचे काल रात्री पाहायला मिळाले. काल सायंकाळी कोल्हापुरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि या भर पावसातच माऊली चौक ते गोखले कॉलेज दरम्यान यादव नगर मेन रोड इथल्या रस्त्यावर डांबरीकरण सुरू होते. या अजब प्रकाराबद्दल नागरिकांमधून महापालिकेविरुद्ध संताप व्यक्त होत आहे.

मुंबई विमानतळावर मोठी त्रुटी, एकाच धावपट्टीवर उतरले दोन विमान

मुंबई विमानतळावरील धक्कादायक प्रकार.

एअर इंडियाच विमान धावपट्टीवर असतानाच इंडिगो विमानाला दिली उतरण्याची परवानगी.

एअर इंडियाच विमान हवेत झेपावत असतानाच इंडिगो विमानाचं झालं लँडिंग.

दोन्ही विमान एकमेकांच्या जवळ आल्याने अपघात होता होता वाचला.

शनिवारी रनवे २७ वर घडलेल्या प्रकाराची DGCA ने केली चौकशी सुरू.

या प्रकरणाशी संबंधित असलेल्या हवाई वाहतूक नियंत्रण कक्षातील (ATC) संबंधित कर्मचाऱ्यांना काम करण्यापासून आलं रोखण्यात.

जालना जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात; शेतकरी सुखावले

जालना जिल्ह्यातील काही भागात आज पावसानं हजेरी लावली. पेरणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसाने दिलासा दिलाय. वडीगोद्री अंतरवाली सराटी शहागड या भागात चांगला पाऊस झाला. यामुळे बळीराजा सुखावला असून पेरणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात असलेल्या महाराष्ट्रातील 2 मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे. नारायण राणे आणि भागवत कराड यांना डच्चू मिळणार असल्याचं कळतंय. भाजप हायकमांड कडून राणे आणि कराड यांना फोन करून मंत्रीमंडळात सहभागी करून घेता येणार नसल्याचं कळवलं आहे. नारायण राणे MSME मंत्री होते तर कराड अर्थ राज्यमंत्री होते.

मुंबईकरांनो छत्रा-रेनकोट बाहेर काढा; दोन दिवसाआधीच शहरात मान्सून धडकला

मुंबईत मान्सून दाखल झाल्याची घोषणा भारतीय हवामान खात्याने केली आहे. सर्वसामान्यपणे ११ जून रोजी मान्सून मुंबईत दाखल होत असतो. मात्र, यंदा दोन दिवस आधीच मान्सून दाखल झाला आहे. मुंबई दाखल होण्याचे सर्व निकष पूर्ण झाल्यानंतर मान्सून दाखल झाल्याचे जाहीर

सुप्यात लागले सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर

सुप्रिया सुळे यांच्या विजयाची बारामतीमधील सुपा येथे बॅनरबाजी पाहायला मिळाली आहे. 'वादा तोच दादा नवा' असा, युगेंद्र पवार यांच्या फोटोखाली उच्चार आहे. युगेंद्र पवार बारामती मधून विधानसभा लढविणार आशा चर्चा सुरू असताना बॅनर लावल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

Nanded Accident: नांदेडमध्ये भीषण अपघात, एकाचा मृत्यू

नांदेड ते किनवट जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील सावरी घाटामध्ये मोटार सायकल आणि ट्रकचा विचित्र अपघात झाला. ट्रक चालकाने मोटार सायकल चालकासह एक ते दिड किलोमीटर फरफटत नेल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस; अनेक रस्ते पाण्याखाली

कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात काल मुसळधार पाऊस झाल्याने या पावसामुळे हातकणंगले मधील रेल्वे पुलावरून मोठ्या प्रमाणात बायपास रोडवर पाणी वाहत होते.

रेल्वे पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी बायपास रोडवर साठत असल्यामुळे या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होत असते. काल झालेल्या पावसामुळे रेल्वे पुलावरून वाहणाऱ्या पाण्याने धबधब्याचं रूप धारण केलं होतं. तर मजले गावातील तलावात मोठ्या प्रमाणात पहिल्याच पावसात पाणी साठलं आहे.

भाजपाने पुण्यात समुद्रही आणून दाखवला; जयंत पाटील यांचा टोला

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुण्यातील पावसावरून भाजपला टोला लगावला "काल पुण्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसात संपूर्ण पुणे शहर जलमय झाल्याची दृश्ये मी पाहिली. रस्त्यांवरून अक्षरशः नद्या वाहत होत्या. संपूर्ण चौकच्या चौक पाण्यात बडून गेले होते. अनेक चार चाकी गाड्या देखील पाण्यात पूर्णपणे बुडाल्या होत्या. अवघ्या दोन तासांच्या पावसात पुणे शहराची ही अवस्था झालेली आहे".

"पुणे महानगरपालिकेमध्ये सलग पाच वर्ष सत्तेत राहून तत्कालिन सत्ताधाऱ्यांनी काय विकास केला हे आज सिद्ध झाले. पुण्यात समुद्र नाही याची पुणेकरांना कायम खंत होती म्हणूनच की काय भाजपाने पुण्यात समुद्रही आणून दाखवला", असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.

मुसळधार पावसाने कोकणाला झोडपलं; सिंधुदुर्गात २४ तासांत १२१ मिलिमीटर पावसाची नोंद

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या २४तासात मुसळधार पाऊस झाला आहे. जिल्ह्यात १२१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस १८७ मिलिमीटर कुडाळ तालुक्यात झालाय तर देवगड मध्ये 158 मिलिमीटर मालवण मध्ये १५२ मिलिमीटर सावंतवाडी मध्ये १४३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पहाटे पासून पावसाने पुर्णपणे विश्रांती घेतली असली तरी पुढच्या 24 तासात जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

बीडच्या माजलगाव परिसरात जोरदार पाऊस; सरस्वती नदीला मोठा पूर

बीडच्या माजलगाव तालुक्यातील काही भागात जोरदार पाऊस झालाय. यामुळं माजलगावच्या कोथाळा गावातून वाहणारी सरस्वती नदी दुथडी भरून वाहू लागली आहे..त्याचबरोबर या पहिल्याच पावसामुळे अनेक ठिकाणी ओढे देखील वाहू लागले आहेत.

तर दुसरीकडे शेतामध्ये देखील पाणीच पाणी साचल्याच पाहायला मिळतंय.. बीड जिल्ह्यातील अनेक भागात मध्यरात्री पावसाने चांगलीच दमदार हजेरी लावली. यामुळं पेरण्या लवकर होतील, असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

आवक घटल्याने भाज्यांचे दर कडाडले, कोथिंबीर 200 तर मिरची 120 पार

मागील काही दिवसांपासून भाज्यांची आवक मंदावल्याने भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. परिणामी, ग्राहकांना हात आखडता घ्यावा लागत असल्याची स्थिती आठवडी बाजारात दिसून आली. यात मिरची, शेवगा, फुलकोबी, गवार 120 रुपये किलोवर पोहोचली. उन्हामुळे बाजारात भाज्यांची आवक मंदावली आहे.

शिवाय यंदा अत्यल्प पावसामुळे अनेक शेतकऱ्यांना भाजीपाल्याचे उत्पादन घेता आले नाही. परिणामी, बाजारात भाज्यांचे दर कडाडल्याची स्थिती दिसून येत आहे. बाजारात काही भाज्यांनी शंभरी ओलांडली आहे.

मिरची, शेवगा, फुलकोबी, गवार, शेपू, मेथी, कोथिंबीर या भाज्यांनी शंभरी पार केली आहे. पालक, कारले, टोमॅटो, दोडके, भेंडी, बटाटेही भाव खात आहेत. परिणामी, गृहिणींना भाज्या खरेदी करताना हात आखडता घ्यावा लागत आहे.

Narendra Modi oath ceremony LIVE : JDU कोट्यातून ललन सिंह केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेणार

नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे. त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तारही आज पार पडणार आहे. यामध्ये JDU कोट्यातून ललन सिंह केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेणार आहे. तर रामनाथ ठाकुर मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे.

चंद्राबाबू नायडू यांच्या TDP पक्षाचे 2 खासदार शपथ घेणार, मोदींच्या मंत्रिमंडळात कुणाचा समावेश?

बिहारचे माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात शपथ घेणार असल्याची माहिती आहे. मांझी हे बिहारमधील हम पक्षाचे प्रमुख आहेत. त्याचबरोबर चंद्राबाबू नायडू यांच्या TDP पक्षाचे 2 खासदारही आज शपथ घेणार असल्याचं कळतंय. राममोहन नायडू कॅबिनेट मंत्री म्हणून तर पेम्मासानी चंद्रशेखर हे राज्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. TDP हा NDA मधील सर्वात मोठा घटकपक्ष आहे.

मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी महाराष्ट्रातील खासदारांना फोन, कुणाची लागणार वर्णी

मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी महाराष्ट्रातील काही खासदारांना दिल्लीतून फोन आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप खासदार नितीन गडकरी, शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांना फोन आल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

शपथविधीआधी मोदी पोहोचले राजघाटावर; महात्मा गांधी यांच्या समाधीचं घेतलं दर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यापूर्वी त्यांनी सकाळी महात्मा गांधींच्या समाधी राजघाटावर पोहोचून राष्ट्रपिता यांना आदरांजली वाहिली. यानंतर ते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या समाधीस्थळी गेले. मोदींनी अटल स्मृती स्थळावर जाऊन आदर व्यक्त केला. यानंतर नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील युद्ध स्मारकावर पोहोचून शहीद जवानांना आदरांजली वाहिली.

Narendra Modi oath ceremony LIVE : नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ

लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवल्यानंतर भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आज सत्तास्थापन करणार आहे. नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. दिल्लीतील राष्ट्रपती भवनात त्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी राष्ट्रपती द्रौपती मुर्मू मोदींना पंतप्रधानपदाची शपथ देतील. या सोहळ्याला अनेक देशांमधील नेत्यांची उपस्थिती राहणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.