Maharashtra Monsoon update saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Monsoon: आनंदाची बातमी! केरळमध्ये धडकलेला मान्सून महाराष्ट्रात कधी पोहोचणार? वाचा सविस्तर

Maharashtra Monsoon update : मान्सून केरळमध्ये धडकलाय. हा मान्सून महाराष्ट्रात कधी पोहोचणार, याविषयी महत्वाची अपडेट हवामान विभागाने दिली आहे.

Vishal Gangurde

उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी हाती आली आहे . मान्सून केरळात दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने घोषणा केली आहे. मान्सून एक आठवड्याआधीच मान्सून दाखल झाला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे.

केरळमध्ये मान्सून आज शनिवारी दाखल झाल्याची माहिती मिळाली. भारतीय हवामान खात्यानं यासंदर्भात घोषणा केली आहे. यंदा मान्सून आठवडाभर लवकरच येणार असल्याचा अंदाज खरा ठरलाय. यापूर्वी मान्सून केरळात 2009 साली 23 मे रोजी दाखल झाला होता. त्यानंतर आता 15 वर्षांनी मान्सून लवकर केरळात दाखल झाला आहे. मान्सून गोव्याच्या वेशीवर पोहोचला आहे. त्यामुळे मान्सून 31 मेपर्यंत महाराष्ट्रात धडक देण्याचा अंदाज आहे.

दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळमध्ये जोरदार वळवाचा पाऊस सुरु आहे. मान्सून आठवडाभर लवकरच येण्याचा अंदाज खरा ठरलाय. मान्सूनसाठी अनुकुल परिस्थिती बनल्याने रेंगाळण्याची सूतराम शक्यता नाही. यामुळे बळीराजानेही लगबग सुरु केली आहे. महाराष्ट्रात मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा पुढील आठवड्यात पोहोचण्याची मोठी शक्यता आहे. यंदा मान्सूनने १६ वर्षांपूर्वीचा योग साधला आहे.

दरम्यान, रत्नागिरीला मुसळधार पावसानं अक्षरश: झोडपून काढलंय. वेगवान वाऱ्यामुळे समुद्र चांगलाच खवळलाय. पुढचे 48 तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. जिल्हा प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय.

पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट

पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पुढील ३ तासांत कोल्हापूर, सातारा, पुणे, रायगड या जिल्ह्यांमध्ये या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकाट आणि मध्यम स्वरुपाच्या पावसासह ताशी ४०-५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mhada Flat : 'म्हाडाचे घर' सर्वसामान्यांसाठी 'लुटीचा अड्डा'? कुणी केला गंभीर आरोप, वाचा

L Ganesan death : मृत्यूशी झुंज अपयशी ठरली; राज्यपाल एल. गणेशन यांचं निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Woman Threatening: 'तुझे कपडे उतरवून तुला...';पिंक टी-शर्टवाल्या बाईचा भररस्त्यात राडा,व्हिडिओ व्हायरल

Meat Ban Row : दाबा लोकशाहीचं बटन, दाबून खा मच्छी मटण

Human Washing Machine : आता वॉशिंग मशिन माणुसही धुणार; 15 मिनिटांत तुम्ही व्हाल ताजेतवाने, वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT