Salman Khan : सुरक्षा भेदली, गॅलेक्सीच्या लिफ्टने प्रवास; सलमान खानच्या घरात मध्यरात्री घुसणारी तरुणी कोण? माहिती आली समोर

Salman Khan News : सलमान खानच्या मध्यरात्री घरात ३२ वर्षीय तरुणी शिरली. ३२ वर्षीय तरुणी सुरक्षा भेदून घरात पोहोचली. त्यानंतर खळबळ उडाली होती.
Salman Khan News update
Salman Khan News Saam tv
Published On

संजय गडदे, साम टीव्ही

Salman Khan News : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलक्सी अपार्टमेंटमधील घरात तरुणी घुसल्याची बाब उघडकीस आली आहे. मध्यरात्री अचानक तरुणी घरात घुसल्याने पोलिलांनी तातडीने तपास सुरु केला. पोलिसांनी या प्रकरणी मध्यरात्री घरात घुसणाऱ्या तरुणीवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तरुणीवर गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे.

कोण आहे ही तरुणी?

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता सलमान खानच्या घरी एक तरुणी मध्यरात्री अचानक घरात घुसली. या तरुणीला वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे. ईशा छाब्रा असे तरुणीचे नाव आहे. ३२ वर्षीय ईशा ही १९ मे रोजी पहाटे ३.३० वाजता सलमान खानच्या घरात घुसली.

salman khan
salman khan news Saam tv
Salman Khan News update
Beed Police Transfers : मोठी बातमी! बीडमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह 606 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या

salman khan सलमान खानची सुरक्षा भेदून तरुणी गॅलेक्सी अपार्टमेंटच्या लिफ्टमधून चक्क सलमान खानच्या घरी पोहोचली. त्यानंतर सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधील सुरक्षा रक्षकांनी तरुणीला ताब्यात घेऊन बांद्रा पोलिसांच्या ताब्यात दिले. सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून बांद्रा पोलिसांनी तरुणीच्या विरोधात गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे.

Salman Khan News update
Vaishnavi Hagawane Case : हगवणेला धाब्यातून जेवण; वैष्णवीच्या वडिलांनी सुप्रिया सुळेंना नेमकं काय सांगितलं?

दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून सलमान खानच्या सुरक्षेचा धोका निर्माण होत आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून सलमान खानला सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. यामुळे सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्याचदरम्यान एक तरुणी सलमान खानच्या घरात शिरल्याने खळबळ उडाली आहे. सलमान खानच्या घरात घुसलेल्या तरुणीवर मुंबई पोलिसांनी या प्रकरणात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

Salman Khan News update
IPS Transfers : राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका; पाहा कुणाची कुठे बदली?

काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानच्या घरात एक अनोळखी शिरला होता. या व्यक्तीने घरात घुसून सलमान खानवर गंभीर वार केले होते. सैफच्या घरात शिरलेल्या व्यक्तीने शाहरुख खानच्या घराजवळही रेकी केली होती. आता सलमान खानच्या थेट घरी तरुणी घुसल्याने कलाकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com