Beed Police Transfers : मोठी बातमी! बीडमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह 606 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या

Beed Police Update : बीडमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह 606 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी हा निर्णय घेतला आहे.
Beed Police distrct
Beed PoliceSaam tv
Published On

योगेश काशिद, साम टीव्ही

बीडच्या पोलीस वर्तुळातून मोठी बातमी हाती आली आहे. बीड पोलीस दलातील शेकडो कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी निर्णय घेऊन जिल्ह्यातील एकूण ६०६ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

Beed Police distrct
Maharashtra Politics : छगन भुजबळांच्या एन्ट्रीने सत्ताकारणात ट्विस्ट',धनंजय मुंडेंचं राजकीय भवितव्य धोक्यात? वाचा सविस्तर

जिल्ह्यातील ६०६ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधील पोलीस प्रशासनावर सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास राहिला नव्हता. बीड जिल्ह्यामधील बिघडत चाललेली कायदा आणि सुव्यवस्था दिवसाढवळ्या अपहरण, दरोडा मारहाण या घटना थांबायचे नाव घेत नाहीत. त्याचबरोबर पोलीस खात्यावर वारंवार होत असलेले आरोप यामुळे बीडची पोलीस यंत्रणा आणि पोलीस यंत्रणाच्या कामावर उपस्थित जात आहे. या पार्श्वभूमीवर जाणारे शंका यामुळे पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी बीड जिल्ह्यातील ६०६ अंमदलदारांच्या बदल्या केल्या आहेत.

Beed Police distrct
Shocking : एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं! सख्ख्या बहीण-भावाचा बंधाऱ्यात बडून मृत्यू, परिसरात हळहळ

पोलीस अधीक्षक नवनीत यांच्या निर्णयाने बीडमधील पोलीस दलामध्ये मोठी खळबळ निर्माण झाली आहे. ज्या भागात पोलीस कर्मचारी वास्तव्यास रहिवासी आहे, त्या भागातील पोलीस कर्मचाऱ्यांची बदली दुसऱ्या तालुक्यात करण्यात आली आहे. यामुळे कुठल्याही पद्धतीने किंवा चुकीचे काम होणार नाही, याची खबरदारी पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी घेतली आहे.

Beed Police distrct
Vaishnavi Hagawane : राजकीय नेत्याकडून सुनेचा हुंडाबळी; वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाची A टू Z माहिती

राज्यात बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर होण्याआधीच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरु झालाय. राज्यातील एकूण २१ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या निर्णयाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना नवीन पोलीस अधीक्षक मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com