
छगन भुजबळांनी मंत्रिमंडळात कमबॅक केल्यानंतर आता सत्ताकारणात नवा ट्विस्ट आलाय. छगन भुजबळांच्या एण्ट्रीनं पुढच्या 5 वर्षांसाठी धनंजय मुंडेंचा मंत्रिमंडळातील पत्ता कट झाल्याचं म्हटलं जातंय.. त्यामुळेच अस्वस्थ धनंजय मुंडे आणि अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट नाराजी व्यक्त केल्याची माहिती सुत्रांनी दिलीय... त्यामुळे विरोधकांच्या हाती आयतंच कोलित मिळालंय....
5 वर्ष मुंडे मंत्री होणार नाहीत, असं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले. महायुती सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवारांनी छगन भुजबळांकडील अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपद धनंजय मुंडेंकडे सोपवलं.. मात्र अवघ्या 84 दिवसात धनंजय मुंडेंवर मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची नामुष्की आली.
दुसरीकडे मंत्रिमंडळातून डावलल्यानं भुजबळांनी उघडपणे अजित पवारांविरोधात मोर्चा उघडला..आणि भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला... भुजबळांची पुन्हा मंत्रिमंडळात एण्ट्री झालीय.. तर मुंडेंच पत्ता 5 वर्षांसाठी कट झाल्याचं म्हटलं जातंय.. त्याची नेमकी कारणं काय आहेत? पाहूयात.
सरपंच हत्या प्रकरणात मुंडेंच्या निकटवर्तीयाचा सहभाग
मुंडेंना करुणा शर्मा प्रकरणंही भोवल्याची चर्चा
कृषी घोटाळ्याच्या आरोपामुळे मुंडे बॅकफूटवर
मुंडेंनंतर बलाढ्य ओबीसी नेते भुजबळांना संधी
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मुंडेंच्या इमेजला गेलेला तडा, घोटाळ्यांचे आरोप यामुळे मुंडेंचं मंत्रिमंडळातील इनकमिंग कठीण असल्याचं म्हटलं जातंय... मात्र दुसरीकडे टीकेची झोड उठवणाऱ्या भुजबळांचं कमबॅक अजित पवारांच्या संमतीनं झालंय की भाजपच्या दबावानं? याचीही चर्चा रंगलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.