Actor Threat Call: 'सलमान खानच्या घरी गोळीबार केला तसाच...'; 'या' टीव्ही अभिनेत्याला बिश्नोई टोळीकडून धमकी

Actor Gets Death Threat Call: बॉलिवूड अभिनेता सलमान खानला बिश्नोई टोळीकडून अनेक वेळा धमक्या मिळाल्या आहेत. आता एका टीव्ही अभिनेत्यालाही धमकीचा संदेश मिळाला आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने तो बिश्नोई टोळीचा एक माणूस असल्याचा दावा केला आहे.
Actor Gets Death Threat Call
Actor Gets Death Threat CallSaam Tv
Published On

Actor Gets Death Threat Call: टीव्ही अभिनेता अभिनव शुक्ला सध्या मोठ्या अडचणीत सापडला आहे. एका कार्यक्रमात आसिम रियाजबाबत केलेल्या वक्तव्यामुळे तो सोशल मीडियावर ट्रोल होतो आहे. या वादात आता आणखी गंभीर वळण आलं आहे. आता अभिनवला लॉरेंस बिष्णोई गँगकडून जीव मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत.

एका अज्ञात व्यक्तीने अभिनवला ई-मेलद्वारे धमकी दिली असून त्यामध्ये त्याचं नाव थेट बिष्णोई गँगशी जोडलं गेलं आहे. विशेष म्हणजे सलमान खानला देखील यापूर्वी याच गँगकडून धमक्या मिळाल्या होत्या. त्यामुळे या प्रकरणाकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे.

Actor Gets Death Threat Call
Kesari 2 Box Office Collection: 'जाट'पेक्षा अक्षय कुमारचा 'केसरी 2' लय भारी; फक्त दोन दिवसांत कमावले इतके कोटी

यामुळे अभिनव शुक्ला आणि त्याच्या पत्नीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी यासंदर्भात तपास सुरू केला असून धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. अभिनवने माध्यमांना सांगितलं की, "हे फक्त माझ्यासाठीच नाही तर माझ्या कुटुंबासाठीही धोकादायक आहे."

Actor Gets Death Threat Call
Yuzvendra Chahal and RJ Mahvash: क्रिकेटपटू युजवेंद्र चहलच्या रूमर्ड गर्लफ्रेंडला VIP ट्रीटमेंट, पाहा VIDEO

या घटनेमुळे टीव्ही इंडस्ट्रीत चिंतेच वातावरण निर्माण झाले आहे. कलाकारांवर सतत वाढणाऱ्या सोशल मीडिया वादांचे गंभीर परिणाम आता प्रत्यक्ष जीवनावर होताना दिसत आहेत. चाहते आणि सह अभिनेत्यांनी अभिनवच्या सुरक्षिततेसाठी चिंता व्यक्त केली असून पोलिसांकडून कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com