Kesari 2 Box Office Collection: 'जाट'पेक्षा अक्षय कुमारचा 'केसरी 2' लय भारी; फक्त दोन दिवसांत कमावले इतके कोटी

Kesari Chapter 2 Box Office Collection Day 2: 'केसरी चॅप्टर 2' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर उत्तम सुरुवात केली असून दुसऱ्या दिवशीही त्याच्या कमाईत भरघोस वाढ झाली आहे.
Kesari 2 Box Office Collection Day 2
Kesari 2 Box Office CollectionSAAM TV
Published On

Kesari Chapter 2 Box Office Collection Day 2: 'केसरी चॅप्टर 2' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर उत्तम सुरुवात केली असून दुसऱ्या दिवशीही त्याच्या कमाईत भरघोस वाढ झाली आहे. अक्षय कुमार, आर. माधवन आणि अनन्या पांडे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी तब्बल १७ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या कथानकाला प्रेक्षक चांगला प्रतिसाद देत असून, चित्रपटाचे सादरीकरण प्रेक्षकांच्या मनाला भिडले आहे.

चित्रपटाने पहिल्याच दिवशी १३.५ कोटींचा गल्ला जमवला होता. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी या आकड्यात लक्षणीय वाढ झाली आणि चित्रपटाची एकूण कमाई ३०.५ कोटींपर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची गर्दी वाढताना दिसत आहे, त्यामुळे रविवारच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ‘केसरी चॅप्टर 2’ हा 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘केसरी’चा सिक्वेल असून, यामध्ये नव्या कथा आणि पात्रांची भर पडलेली आहे.

Kesari 2 Box Office Collection Day 2
Sonu Sood: सोनू सूदचा शिक्षणासाठी पुढाकार; १०० मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली

या चित्रपटात अक्षय कुमारने पुन्हा एकदा आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आर. माधवनने साकारलेली भूमिका विशेष चर्चेत असून, त्याच्या अभिनयाचे समीक्षकांकडूनही कौतुक होत आहे. अनन्या पांडे हिच्या भूमिकेला तरुण प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. दिग्दर्शकाने चित्रपटाचे प्रत्येक दृश्य प्रभावी बनवले असून, विशेषतः कोर्टातील डायलॉगबाजी प्रेक्षकांना अधिक आवडत आहे.

Kesari 2 Box Office Collection Day 2
Phule Movie: 'चित्रपटात फक्त ऐतिहासिक सत्य...'; 'फुले' चित्रपट वादावरुन दिग्दर्शकांची भूमिका, म्हणाले- ट्रेलरवरूनच...

चित्रपट तांत्रिकदृष्ट्याही उत्तम दर्जाचा आहे. पार्श्वसंगीत, छायाचित्रण आणि संकलन या तिन्ही बाबतीत ‘केसरी चॅप्टर 2’ ने प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. चित्रपटाने दुसऱ्या दिवशी कमावलेल्या १७ कोटींच्या कमाईमुळे या चित्रपटाकडे सकारात्मक दृष्टया पहिला जात असून हा चित्रपट जाट आणि सिकंदर पेक्षा उत्तम असल्याचे प्रेक्षक बोलत आहेत. आता रविवारी मिळणाऱ्या प्रतिसादावर चित्रपटाचे पहिले आठवड्याचे यश अवलंबून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com