Yuzvendra Chahal and RJ Mahvash: क्रिकेटपटू युजवेंद्र चहलच्या रूमर्ड गर्लफ्रेंडला VIP ट्रीटमेंट, पाहा VIDEO

Yuzvendra Chahal and RJ Mahvash: भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि रेडिओ जॉकी महवश यांच्यातील अफेअरच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आले आहे.
RJ MahvashS And Yuzvendra Chahal
RJ MahvashS And Yuzvendra ChahalSaam Tv
Published On

Yuzvendra Chahal and RJ Mahvash: भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि रेडिओ जॉकी महवश यांच्यातील अफेअरच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आले आहे. क्रिसमसच्या निमित्ताने दोघांचे एकत्र लंच करतानाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर या चर्चांना अधिक बळ मिळाला. दोघेही सतत एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. दरम्यान, आता आरजे महवश आयपीएल २०२५ मध्ये युजवेंद्र चहलसोबत पंजाब किंग्ज (पीबीकेएस) संघाच्या बसमध्ये चढताना दिसली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी असा दावा करायला सुरुवात केली आहे की हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत.

प्रत्येक क्रिकेटप्रेमींना माहिती आहे की फक्त खेळाडू आणि त्यांच्या पार्टनरलाच आयपीएलच्या टीम बसमध्ये चढण्याची परवानगी असते. अशा परिस्थितीत, चहलसोबत महवाशची उपस्थितीने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. आयपीएलच्या सुरुवातीलाच क्रिकेटपटू हार्दिक पंड्याची कथित गर्लफ्रेंड जास्मिन मुंबई इंडियन्स संघाच्या बसमध्ये दिसली होती.

RJ MahvashS And Yuzvendra Chahal
Kesari 2 Box Office Collection: 'जाट'पेक्षा अक्षय कुमारचा 'केसरी 2' लय भारी; फक्त दोन दिवसांत कमावले इतके कोटी

महवेश आणि चहल पुन्हा एकत्र दिसले

सध्या युजवेंद्र चहलचे नाव आरजे महवशची खूप चर्चा सुरु आहे. दरम्यान, एक नवीन व्हिडिओ व्हायरल झाला आहे यामध्ये ते दोघेही एकत्र दिसत आहेत. यानंतर आता चाहते दोघांमधील नात्याबद्दल बोलत आहेत. दोघांच्याही नवीन व्हिडिओला हजारो लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. लोकांना ही नवी जोडी आवडायला लागली आहे.

RJ MahvashS And Yuzvendra Chahal
Sonu Sood: सोनू सूदचा शिक्षणासाठी पुढाकार; १०० मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली

महवश आणि युजवेंद्र यांच्याबद्दल पहिल्यांदाच चर्चा होत नसून अलीकडेच, कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज या सामन्यात युजवेंद्र चहलला प्लेअर ऑफ द मॅच मिळाल्याने, महवशने इन्स्टाग्राम स्टोरीवर चहलचे कौतुक करणारा एक सेल्फी पोस्ट केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com