- सागर निकवाडे
युवा वर्गाने समाज माध्यमाचा (social media) वापर काळजीपूर्वक करावा असे आवाहन नंदुरबार जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रवण दत्त (shravan dutt ips) यांनी केले आहे. समाजविघातक संदेश पाेस्ट केल्यास अथवा सामाजिक शांतता भंग हाेईल अशी पोस्ट व्हायरल केल्यास गुन्हा दाखल हाेताे. प्रसंगी युवकांच्या करिअरला बाधा पाेहचते असेही दत्त यांनी नमूद केले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दत्त म्हणाले आजच्या आधुनिक युगात तरुण पिढी मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांचा वापर करत आहे. समाज माध्यमातून समाज विघातक आणि दोन समाजात तेढ निर्माण होतील अशा प्रकारच्या पोस्ट व्हायरल होतात. त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होताे.
दत्त पुढे म्हणाले या पोस्ट पोलिसांच्या नजरेतून सुटत नसतात. यातून कायदा संस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर अशा पोस्ट व्हायरल करणाऱ्या तरुणांवर गुन्हे दाखल होत असतात. त्यातून तरुणांचे भविष्य खराब होते.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
त्यामुळे तरुणांनी समाजविघातक संदेश आणि जातीय तेढ निर्माण होणारे मेसेज टाकू नयेत. जिल्ह्यात पोलीस दलाच्या वतीने समाज माध्यमांची मॉनिटरिंग करण्यात येत आहे. चुकीच्या पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे असेही दत्त यांनी स्पष्ट केले.
पाेलिस दल विद्यार्थ्यांत जनजागृती करणार
नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार पोलीस दलाच्या वतीने सर्व शाळा आणि महाविद्यालयांत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. त्यासोबत पालकांच्या ही कार्यशाळा घेण्यात येणार असल्याची माहिती नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रावण दत्त यांनी दिली.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.