Kolhapur kini Toll Plaza News Saam Tv
महाराष्ट्र

कोल्हापुरात किणी टोल नाक्यावर मनसेचे आंदोलन; मुदत संपल्याचा दावा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा टोल नाक्यांचा मुद्दा उपस्थित केला आहे.

संभाजी थोरात

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) पुन्हा टोल नाक्यांचा मुद्दा उपस्थित केला आहे. या मुद्द्यावरुन आता आंदालने सुरू करण्यात आली आहेत. कोल्हापुरातील किणी टोल नाक्याची मुदत संपल्याची माहिती काही दिवसांपूर्वी मनसेने दिली होती. आता या प्रकरणी कोल्हापुरातील मनसेने किणी टोल नाक्यावर आंदोलन केले. या आंदोलनात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.

कोल्हापुरातील (Kolhapur) किणी टोल नाका बंद करावा अशी मागणी मनसेने (MNS) केली आहे. या टोल नाक्याची मुदत संपल्याचा दावा मनसेने केला आहे. त्यामुळे हा टोल नाका बंद करा यासाठी टोल नाक्यावर अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले आहे. बँड, कळस घेऊन महिलाही या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.

टोल नाक्याची मुदत संपुनही अजून टोल नाका सुरू आहे. त्यामुळे आता हा टोल नाका बंद करण्यात यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

हे देखील पाहा

किणी टोल नाक्याची मुदत संपल्याचा दावा मनसेने (MNS) केला आहे. आज टोल नाक्यावर मनसेने आंदोलन केले. यावेळी मनसे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मनसे कार्यकर्त्यांनी पंचगंगा नदीचे पाण्याने टोल नाक्याला अभिषेक घातला. या आंदोलनासाठी मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले आहेत.

या आंदालना दरम्यान, गेल्या अर्ध्या तासापासून गाड्या विना टोल घेता सोडण्यात येत आहेत. गेल्या १७ वर्षापासून हा टोल नाका सुरू आहे. या टोल नाक्याची ५० दिवसापासून मुदत संपली आहे, तर पूर आणि कोरोनाचे कारण देत हा टोल नाका सुरू ठेवल्याचा दावा मनसेने केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सुविधांचा दर्जा सुधारला

Raksha Bandhan: रक्षाबंधनपासून 3 राशींची होणार चांदीच चांदी; शनी-मंगळ बनवणार पॉवरफुल योग

Success Story: संघर्षाच्या काळात गर्लफ्रेंडने दिली साथ; कोणत्याही कोचिंगशिवाय क्रॅक केली JPSC; अमन कुमार यांचा प्रेरणादायी प्रवास

ladki bahin yojana : अपात्र महिला आणि बोगस भावांना दणका; अपात्र लाडक्यांकडून पैसे वसूल करणार, वाचा स्पेशल रिपोर्ट

Thursday Horoscope : आयुष्याच्या वळणावर आव्हाने स्वीकारावे लागणार; 'या' राशींच्या लोकांना जवळच्याच व्यक्तींकडून विरोध होईल

SCROLL FOR NEXT