Maharashtra Monsoon Session: विधान भवन परिसरात आमदारांचा राडा; सत्ताधारी- विरोधकांमध्ये धक्काबुक्की, पाहा व्हिडिओ

आज पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे, गेले चार दिवस वादळी ठरले आहेत.
Maharashtra Monsoon Session
Maharashtra Monsoon SessionSaam Tv

मुंबई: आज पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे, गेले चार दिवस वादळी ठरले आहेत. आजचा दिवस देखील वादळी ठरण्याची शक्यता आहे. आजच्या दिवसाची सुरूवातच वादळी झाली आहे. गेली चार दिवस विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांविरोधात घोषणाबाजी केली. मात्र आज शिंदे गटातील आमदारांनी आज थेट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. यादरम्यान, विधान भवन परिसरात आमदारांचा राडा झाला. सत्ताधारी- विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे दिसले. (Maharashtra Monsoon Session)

Maharashtra Monsoon Session
विरोधकांच्या घोषणाबाजीवर केसरकरांचा आक्रमक पवित्रा; म्हणाले, ५० खोके सोडा, ५० रुपये जरी...

आज सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरेंविरोधात आंदोलन केले. तिथेच विरोधकदेखील आंदोलन करताना दिसत आहेत. दरम्यान, दोन्ही गटात बाचाबाची झाली असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, अजित पवार यांनी समजुतीचा मार्ग काढत त्यांनी सुरू असलेला वाद थांबवला. या वादात आमदार अमोर मिटकरी (Amol Mitkari) यांनी महेश शिंदे यांची कॉलर पकडली असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, मिटकरांनी माध्यमांशी बोलताना शिंदे गटातील नेत्यांनी शिवीगाळ केली असल्याचा आरोप केला. आई-बहिणींनीवरुन शिवी दिली असल्याचा आरोपही मिटकरी यांनी केला आहे. दोन्ही गटाकडून एकमेकांविरोधात घोषणाबाजी करत होते. त्यामुळे विधान भवना बाहेर एकच गोंधळ निर्माण झाला होता. (Maharashtra Monsoon Session)

हे देखील पाहा

Maharashtra Monsoon Session
पुणेकर जगात भारी! पठ्ठ्याने थेट अमेरिकेत जाऊन घेतली एलन मस्क यांची घेतली भेट

सत्ताधाऱ्यांना आमच्या घोषणा झोंबल्या: अजित पवार

महाराष्ट्रातील सर्व जनता पाहत आहे, १७ तारखेपासून अधिवेशन सुरू आहे, आजपर्यंत आम्ही पायऱ्यांवर विरोधात घोषणाबाजी केली. त्या घोषणा आज सत्ताधाऱ्यांन झोंबल्या आहेत. आमच्या मागणीकडे लक्ष न देता. ५० ओके ही घोषणा सत्ताधाऱ्यांच्या जिव्हारी लागली आहे, असंही विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com