Devendra Fadnavis, Ajit Pawar
Devendra Fadnavis, Ajit PawarSaam Tv

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मदतीला आले विरोधी पक्षनेते अजित पवार, पाहा नेमकं काय घडलं?

आज पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे, गेले चार दिवस वादळी ठरले.
Published on

मुंबई: आज पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे, गेले चार दिवस वादळी ठरले. आजच्या दिवसाची सुरुवातही वादळी झाली. गेली चार दिवस विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांविरोधात घोषणाबाजी केली. मात्र आज शिंदे गटातील आमदारांनी आज थेट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. तर विधिमंडळात शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांच्या प्रश्नांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले, पण तरीही कांदे आक्रमक होते, यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार फडणवीस यांच्या मदतीला आल्याचे पाहायला मिळाले. (Maharashtra Monsoon Session)

Devendra Fadnavis, Ajit Pawar
वाझेंचे खोके, मातोश्री ओक्के; उद्धव ठाकरेंविरोधात शिंदे गटाची घोषणाबाजी

विधिमंडळात आज शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे आक्रमक झाले होते. माजी मंत्री आमदार छगन भुजबळ यांच्या कार्यकाळात कथित भ्रष्टाचारासंदर्भात त्यांनी काही प्रश्न विचारले. यावेळी ते आक्रमक झाले होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना उत्तर दिले. पण सुहास कांदे (Suhas Kande) यावेळी नाराज झाले. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीला आल्याचे पाहायला मिळाले.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे, पण कांदे यांनी मला हे उत्तर असेच पाहिजे म्हणू शकत नाहीत, अशी समज विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आमदार सुहास कांदे यांना दिली.

हे देखील पाहा

Devendra Fadnavis, Ajit Pawar
Maharashtra Monsoon Session: विधान भवन परिसरात आमदारांचा राडा; सत्ताधारी- विरोधकांमध्ये धक्काबुक्की, पाहा व्हिडिओ

काय म्हणाले अजित पवार?

विधिमंडळात आमदार सुहास कांदे यांनी माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यकाळात कथित घोटाळ्याच्या फाईल संदर्भात काही प्रश्न विचारले. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना, ही फाईल त्यावेळी असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी बंद केली आहे. यावर शासन योग्य ती कारवाई करेल. त्या संदर्भातील निर्णय सभागृहात करता येणार नाही. त्या संदर्भातील कायदेशीर बाबी तपासून आपल्या निर्णय करता येईल असं उत्तर फडणवीस यांनी दिले.

यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सुहास कांदे यांना समज दिली. अजित पवार म्हणाले, राज्याचे गृहमंत्री हे याअगोदर मुख्यमंत्री होते, त्यांनी वकीली केली आहे. पण ते आमदार म्हणतात, असंच उत्तर दिले पाहिजे, तसेच उत्तर दिले पाहिजे असा आगृह ते व्यक्त करु शकत नाहीत. यावेळी सभागृहात विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मैत्री पाहायला मिळाली.

Edited By- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com