MLA Vaibhav Naik, Sarpanch, Kokan News saam tv
महाराष्ट्र

MLA Vaibhav Naik : लक्षात ठेवा... ! ACB च्या सूत्रधारांना आमदार वैभव नाईकांचा इशारा

देऊळवाडी येथे नळ योजना विस्तारीकरण करणेबाबत सरपंच यांनी दिलेल्या संपूर्ण अहवालाची माहिती एसीबीने मागविली आहे.

साम न्यूज नेटवर्क

- विनायक वंजारे

MLA Vaibhav Naik On ACB Inquiry : माझ्या आमदार फंडातून ग्रामपंचायतींनी (gramanchayat) कामे केली. त्या त्या ग्रामपंचायतींना एसीबीकडून नोटीसा दिल्या जात आहेत. त्यातून माझ्यावर दबाव आणण्याचा ते वेळोवेळी प्रयत्न करताहेत. मात्र या एसीबीच्या (ACB) चौकशीच्या पाठीमागे जे कोणी सुत्रधार असतील त्यांना एकच सांगतो, अशा चौकशीच्या दबावाला घाबरून आम्ही बळी पडणार नाही. शिवसेनेचे (shiv sena) काम आम्ही अधिक जाेमाने करु अशी प्रतिक्रिया आमदार वैभव नाईक (mla vaibhav naik) यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

आमदार वैभव नाईक यांच्या मतदारसंघातील भरणी कुडाळ येथील सरपंच (Sarpanch) यांना रत्नागिरी लाचलुचपत (acb) विभागाने (ratnagiri anti corruption bureau) नोटीस पाठवली आहे. तसेच त्यांच्या मतदारसंघातील सुमारे चाळीस सरपंच आणि ठेकेदार एसीबीच्या रडारवर असल्याची चर्चा आहे.

दरम्यान आमदार वैभव नाईक म्हणाले माझ्यावर दबाव आणण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला जात आहे. मात्र अशा चौकशीच्या दबावाला घाबरून आम्ही पळ काढणारे नाही. आता आगामी काळात शिवसेनेचे काम आम्ही अधिक जोमाने करू. दरम्यान यापुढच्या काळात अशा अनेक चौकशा आम्ही सुद्धा करू शकतो येवढं विरोधकांनी लक्षात ठेवाव असा इशारा वैभव नाईक यांनी दिला आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT