Vinayak Raut News : अत्यंत खराब कामगिरी करणारा मंत्री म्हणून नारायण राणेंची दिल्लीत चर्चा सुरु आहे. मी त्यांच्या वाईटावर नाही परंतु ही चर्चा दिल्लीत (Delhi) सुरु असल्याने सांगत आहे. पंतप्रधान माेदींनी (Narendra Modi) माेठा निधी त्यांच्या खात्याला दिला परंतु लुबाडणूक, फसवणूक शिवाय काहीच झालेले नाही असा टाेला खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी नारायण राणेंना (Narayan Rane) लगावला.
खासदार विनायक राऊत म्हणाले केंद्रातील मंत्री मंडळ फेरबदलाची चर्चा सुरु आहे की नाही याची माहिती नाही परंतु राणेंची मंत्री म्हणून कामगिरी फारशी काही चांगली नाही. नारायण राणेंनी (narayan rane) एका निवृत्त अधिका-याला घेतले. त्याच्या मार्फत एमएसएमई खात्यामध्ये लुबाडणूक, फसवणूक करण्याचे काम नारायण राणेंच्या कार्यकाळात झाले असा आराेप राऊतांनी केला.
त्या अधीका-या मार्फत दोन महिलांवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला. पंतप्रधानांनी याची दखल घेतली म्हणून त्या अधीका-याची उचलबांगडी झाली असा गंभीर आरोप विनायक राऊत यांनी केला आहे. आता राणेंची उचलबांगडी होवा न होवो ते फक्त कुंकवाला धनी आहेत बाकी त्यांचा उपयोग काही नाही. फक्त शिवसेनेला (shivsena) नडायला त्यांना मंत्री पदावर ठेवायचे असेल तर ठेवू द्या अशी टिप्पणी देखील विनायक राऊत यांनी केली. (Maharashtra News)
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.