Pune Bangalore National Highway : पुणे - बंगळूर महामार्गावर (Pune Bangalore National Highway) आज (साेमवार) पहाटेच्या सुमरास झालेल्या कारच्या अपघातात (accident) दाेन महिलांचा मृत्यू झाला आहे. या दाेन्ही महिला पुण्यातील सराफ व्यावसायिक कुटुंबातील असल्याची माहिती घटनास्थळावरुन प्राप्त झाली आहे. (Breaking Marathi News)
हा अपघात पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खंडाळा बोगद्या जवळ झाला आहे. या अपघातात दाेन महिलांचा मृत्यू झाला आहे तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना सातारा (satara) जिल्ह्यातील शिरवळच्या (Shirval) खाजगी रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळावरुन तसेच पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार हा अपघात पहाटे चारच्या सुमारास खंबाटकी बोगदा (Khambatki Tunnel) सुरू होण्याच्या अलीकडे घडला. चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार कड्याला धडकली. या अपघातात पुण्यातील सराफ व्यावसायिक कुटुंबातील दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.