mla vaibhav naik demands to solve various issues of sindhudurg Saam Digital
महाराष्ट्र

Sindhudurg: कामचुकारपणा करण्यापेक्षा समस्या सोडवा, आमदार वैभव नाईकांचे अधिका-यांना खडेबाेल

mla vaibhav naik demands to solve various issues of electicity : महावितरण कंपनीने कामकाजात सुधारणा करावी अशी अपेक्षा आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केली.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

मालवण शहरातील विविध समस्यां बाबत आमदार वैभव नाईक यांनी प्रमुख अधिकाऱ्यांच्या भेटी घेत आक्रमक शैलीत जनसामान्यांचे प्रश्न मांडत ते प्रश्न तात्काळ सुटले पाहिजेत अशी भुमिका मांडली. शहर आणि तालुक्याच्या विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत निधीची उपलब्धता होण्यासाठी आमचे प्रयत्न असतात. उपलब्ध निधी १०० टक्के खर्च होवून त्याचा फायदा सर्वसामान्यांना मिळावी हिच आपली इच्छा आहे. मात्र प्रशासन स्तरावर वेळेत कार्यवाही होत नसल्याने सांगत आमदारांनी काही अधिकाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावले.

आमदार वैभव नाईक यांनी मालवण दौऱ्यात महावितरण, नगरपालिका, तहसील कार्यालयांतील प्रमुख अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. महावितरण कंपनीच्या कार्यालयात उपकार्यकारी अभियंता सचिन मेहत्रे, उपकार्यकारी अभियंता अतुल पाटील, सहाय्यक अभियंता गुरुदास भुजबळ, अमित तारापुरे, सुनील शिंदे, अर्जुन भिसे तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. पालिका कार्यालयात मुख्याधिकारी संतोष जिरगे, तहसील कार्यालयात तहसीलदार वर्षा झालटे, पोलिस निरीक्षक प्रविण कोल्हे या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

महावितरण कार्यालयात गेल्यानंतर उपस्थित शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समस्यांचा पाढा वाचला. महावितरण कंपनीकडून कोणत्याही प्रकारचे नियोजन न केल्याने शहरातील आणि ग्रामीण भागातील अनेक घरे दोन ते तीन दिवस अंधारात राहिल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

ग्रामीण भागातील अनेक घरे दोन ते तीन दिवस अंधारात राहिल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. महावितरण कंपनीकडे एकच ठेकेदार एजन्सी असल्याने त्याच्यावर कामाची मर्यादा येत असल्याने आणि दोन एजन्सी तालुक्यासाठी नियुक्त करणे आवश्यक असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

कार्यकर्त्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर आमदार नाईक यांनी मालवणसाठी आवश्यक असणारी यंत्रणा आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महावितरण कंपनीची असल्याचे सांगत कोणीही कामचुकारपणा करू नये, तालुक्याच्या समस्या सोडविण्यासाठी तुमची नियुक्ती असून तुमच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधी आहेत. यामुळे जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यरत रहावे, असे स्पष्ट केले.

यावेळी माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी, मंदार ओरसकर, शहरप्रमुख बाबी जोगी, किरण वाळके, यशवंत गावकर, उमेश मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, भाई कासवकर, प्रसाद आडवणकर, दिपक देसाई, उमेश चव्हाण, बाबु कांदळकर, तपस्वी मयेकर, किशोर गावकर, मोहन मराळ, सन्मेष परब, राहूल जाधव, इरफान शेख, फारूक मुकादम, स्वप्नील आचरेकर, दिपा शिंदे तसेच इतर शिवसैनिक उपस्थित होते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT