Uday Samant Saam tv
महाराष्ट्र

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha : रत्नागिरी-सिंधुदुर्गातून नारायण राणेंची उमेदवारी कन्फर्म? किरण सामंतांनी माघार घेतल्याची उदय सामंतांची माहिती

Uday Samant on ratnagiri -sindhudurg lok sabha constituency : 'या जागेवरून इतर नेत्यांना त्रास होत असल्याने किरण सावंत यांनी माघार घेतली, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.

Vishal Gangurde

पराग ढोबळे, नागपूर

Uday Samant News :

ऐन लोकसभा निवडणुकीत महायुतीचा जागावाटपाचा तिढा कायम आहे. राज्यातील काही जागांवरील इच्छुकांची संख्या अधिक असल्याने महायुतीपुढे मोठा पेच उभा राहिला आहे. महायुतीमधील काही जागांमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेचा समावेश आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवर मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण यांनी दावा ठोकला होता. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे देखील इच्छुक होते. 'या जागेवरून इतर नेत्यांना त्रास होत असल्याने किरण सावंत यांनी माघार घेतली, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. मंत्री उदय सामंत यांच्या वक्तव्यानंतर रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेचा तिढा जवळपास मिटल्याचे बोलले जात आहे.

किरण सामंत यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवर दावा ठोकल्याने महायुतीपुढे मोठा पेच पुढे उभा राहिला होता. दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचाही याच जागेवर दावा आहे. या जागेसाठी महायुतीच्या नेत्यांमध्ये मागील काही दिवसांपासून खलबते सुरु होती. मंत्री उदय सामंत यांनी या जागेबाबत नागपूरमधील पत्रकार परिषदेत मोठं वक्तव्य केलं आहे. मंत्री सामंत यांच्या वक्तव्यामुळे नारायण राणे यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाल्याचे बोललं जात आहे.

मंत्री उदय सामंत म्हणाले, 'रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आधी शिवसेनेचे खासदार जिंकले. त्यामुळे शिंदे गटाने या जागेवर दावा केला होता. मात्र, या जागेमुले नेत्यांना त्रास होत असल्याने किरण सावंत यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे जागेसाठीची वाटाघाटी थांबली आहे'.

यवतमाळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत बोलताना मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं की, 'या जागेचा सस्पेन्स ठेवला नाही तर प्रश्न विचारणार नाही. या जागेवरून उद्या सेनेचा उमेदवार अर्ज दाखल करेल. तिन्ही नेत्यांना कोण-कुठे निवडून येईल हा अंदाज आहे. आमच्यासोबत सर्चत गट आहे. तिन्ही नेते फॉर्म्युला ठरवतील'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बीडमध्ये साळेगावजवळ कार पलटी झालेल्या अपघातात दोघे जखमी

Drink Water At Night: रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिणं योग्य की अयोग्य?

Maharashtra Politics: मी मंत्री कसा झालो, मलाही कळालं नाही, मुरलीधर मोहोळ यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा|VIDEO

Jeans: जीन्स घालाल तर जेलमध्ये जाल? 'या' ठिकाणी जीन्स घालण्यावर बंदी

Maharashtra Politics : पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का! बड्या नेत्याने सोडली पक्षाची साथ, भाजपच्या वाटेवर जाण्याच्या चर्चा

SCROLL FOR NEXT