Lok Sabha Elections: लोकसभा निवडणुकीत पोलीस ॲक्शन मोडवर, कल्याण डोंबिवलीत 773 जणांचे रिव्हॉल्वर केले जप्त

Kalyan Dombivli News: लोकसभा निवडणूकीची आचार संहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून कल्याण पोलिस परिमंडळाने विविध पोलीस कारवाई सुरु केली आहे.
Kalyan Dombivli News
Kalyan Dombivli NewsSaam Tv

>> अभिजित देशमुख

Kalyan Dombivli News:

लोकसभा निवडणूकीची आचार संहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून कल्याण पोलिस परिमंडळाने विविध पोलीस कारवाई सुरु केली आहे. निवडणूक गुन्हेगारी आणि भयमुक्त पार पाडण्याकरीता ही कारवाई केली जात आहे. कल्याण डोंबिवलीतील ७७३ जणांकडील रिव्हॉल्वर जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

फेब्रुवारी महिन्यात कल्याण पूर्वेतील भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी द्वारली येथील जमीनीच्या वादातून उल्हासनगर येथील हिल लाईन पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरिक्षकांच्या दालनातच कल्याण शिंदे शिवसेनेच्या शहर प्रमुखावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली होती.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Kalyan Dombivli News
Maharashtra Weather News: राज्यात उष्णतेचा कहर, चंद्रपुरात सर्वाधिक तापमान; कोणत्या जिल्ह्यात कसं आहे वातावरण? जाणून घ्या

या घटनेनंतर कल्याण डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यात किती जणांना रिव्हॉल्वर दिलं आहे, याची चर्चा सुरु झाली. कल्याण पोलिस परिमंडळाच्या हद्दीत १ हजार ३८५ जणांकडे अग्नीशस्त्र आहे. त्यांनी पोलिस परवानगी घेऊन रिव्हॉल्वर बाळगले आहे. १६ मार्चपासून लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून पोलिसांनी १ हजार ३८५ जणांपैकी ७७३ जणांकडील अग्नीशस्त्र निवडणूक काळापूरते जप्त करण्याची कारवाई करण्यात आली  आहे. (Latest Marathi News)

उर्वरित अग्निशस्त्रे जप्त करण्याची कारवाई सुरू आहे. रिव्हॉल्वर जप्त करण्यात आलेल्यांमध्ये राजकीय मंडळीची संख्या जास्त आहे. पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी सांगितले की, २०१९ साली कल्याण पोलिस परिमंडळाने ५२४ जणांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. यंदा २०२४ सालच्या लोकसभा निवडणूकीकरीता १ हजार १६५ जणांच्या विरोधात कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यापैकी ५९३ जणांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Kalyan Dombivli News
Hatkanangle Lok Sabha: हातकणंगलेत धैर्यशील मानेच महायुतीचे उमेदवार असतील, सदाभाऊ खोत यांचा दावा

विशेष म्हणजे ११९ जणांच्या विरोधात अजामीन पात्र स्वरुपाची कारवाई करुन त्यांची कारागृहात रवानगी केली आहे. या विविध स्वरूपाच्या कारवाईत सीआरपीसी, महाराष्ट्र पोलिस कायदा आणि एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com