Maharashtra Weather News: राज्यात उष्णतेचा कहर, चंद्रपुरात सर्वाधिक तापमान; कोणत्या जिल्ह्यात कसं आहे वातावरण? जाणून घ्या

Maharashtra Weather Update (1st to 5th April 2024) in Marathi: एप्रिल महिना सुरू झाला. देशासह राज्यात आता उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. यातच हवामान विभागाने अनेक राज्यांमध्ये ५ एप्रिलपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
Maharashtra Weather (1st to 5th April 2024) Update
Maharashtra Weather (1st to 5th April 2024) UpdateSaam Tv

Maharashtra Weather News: :

एप्रिल महिना सुरू झाला. देशासह राज्यात आता उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. यातच हवामान विभागाने अनेक राज्यांमध्ये ५ एप्रिलपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. अशातच राज्यात चंद्रपुरात सर्वाधिक ४१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. तर अकोल्यात ३९ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.

Accuweather या हवामानाबाबत माहिती देणाऱ्या वेबसाईटवर तापमानासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. Accuweather तापमानाची नोंद वेळेनुसार सतत बदलत असते. अशातच राज्यात कोणत्या जिल्ह्यात किती तापमान आहे, हे आपण जाणून घेणार आहोत... ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra Weather (1st to 5th April 2024) Update
Beed News: धक्कादायक; चुलत्यानेच केला 14 वर्षीय पुतणीवर अत्याचार, असा उघडकीस आला प्रकार

कोणत्या जिल्ह्यात किती आहे तापमान?

Accuweather या वेबसाईटवर राज्यभरातील जिल्ह्यातील तापमानाच्या नोंदी उपलब्ध आहेत. यानुसार, मुंबई ३१ अंश सेल्सियस, नवी मुंबई ३१, ठाणे ३४, पुणे (Pune Weather) ३५, पिंपरी चिंचवड ३६, अहमदनगर ३८, सोलापूर ३८, अमरावती ३८ आणि नागपूर (nagpur temperature) ३९ अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

Mumbai Weather

तसेच मुंबई आणि उपनगरीय भागांबद्दल बोलायचं झालं तर, अंधेरी पूर्व ३१, अंधेरी पश्चिम ३१, भांडुप पूर्व ३१, भांडुप पश्चिम ३१, भिवंडी ३३, कल्याण-डोंबिवली ३७ आणि अंबरनाथ येथे ३७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

Maharashtra Weather (1st to 5th April 2024) Update
Hatkanangle Lok Sabha: हातकणंगलेत धैर्यशील मानेच महायुतीचे उमेदवार असतील, सदाभाऊ खोत यांचा दावा

दरम्यान हवामान विभागाने माहिती दिली आहे की, एप्रिल ते जून दरम्यान कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. मध्य भारत, उत्तर मैदानी प्रदेश आणि दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये उष्णतेची लाट अनेक दिवस राहण्याचा अंदाज आहे. या राज्यांमध्ये गुजरात, महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश यांचा समावेश आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com