Dhairyasheel Mane and Sadabhau Khot
Dhairyasheel Mane and Sadabhau KhotSaam TV

Hatkanangle Lok Sabha: हातकणंगलेत धैर्यशील मानेच महायुतीचे उमेदवार असतील, सदाभाऊ खोत यांचा दावा

Hatkanangle Lok Sabha Constituency: हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराबाबत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
Published on

>> भरत नागने

Hatkanangle Lok Sabha Constituency:

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराबाबत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार धैर्यशील माने हेच असतील, असा मोठा दावा त्यांनी दिला आहे.

धैर्यशील माने याना यंदा तिकीट दिले जाणार नाही, त्यांच्या जागेवरून इतर उमेदवाराला संधी दिली जाईल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगली आहे. तसेच स्थानिक भाजप नेत्यांचाही त्यांच्या नावाला विरोध असल्याचं बोललं जात आहे. अशातच आता रयत क्रांती संघटनेने धैर्यशील माने यांचे समर्थन करत पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे माने यांच्या उमेदवारीवरून रयत क्रांती संघटना आणि भाजप आमनेसामने आले आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Dhairyasheel Mane and Sadabhau Khot
Congress Candidates List: काँग्रेसने 17 उमेदवारांची यादी केली जाहीर, कोण कोणत्या दिग्गजांना मिळाली संधी, जाणून घ्या

मागील दोन दिवसांपासून हातकणंगले मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांची उमेदवारी बदलली जाईल, अशी चर्चा सुरू आहे. मात्र या चर्चा निराधार आहेत. हातकणंगलेत धैर्यशील माने हेच महायुतीचे उमेदवार राहतील, असा विश्वास सदाभाऊ खोत यांनी आज व्यक्त केला आहे.   (Latest Marathi News)

माढा लोकसभा मतदारसंघात भाजपमध्ये उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना आज रयत क्रांती संघटनेने पाठिंबा जाहीर केला. पाठिंबा देण्यासाठी रयत क्रांती संघटनेची टेंभुर्णीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना हातकणंगले मधून धैर्यशील माने हेच महायुतीचे उमेदवार असतील, असे खोत म्हणाले.

Dhairyasheel Mane and Sadabhau Khot
Loksabha Election: नाशिक लोकसभेचा तिढा, महायुतीत रस्सीखेच.. हेमंत गोडसे, भुजबळांपाठोपाठ दादा भुसे तातडीने मुंबईकडे रवाना!

भाजपने रयत क्रांती संघटना, रासप आणि रिपब्लिकन पक्षाला सत्तेत वाट दिला आहे. महादेव जानकर, रामदास आठवले आणि मला आमदार खासदार करून मंत्री केले. भाजपवर आम्ही घटक पक्ष नाराज नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती म्हणून त्यांच्यासोबत असल्याचेही सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com