Loksabha Election: नाशिक लोकसभेचा तिढा, महायुतीत रस्सीखेच.. हेमंत गोडसे, भुजबळांपाठोपाठ दादा भुसे तातडीने मुंबईकडे रवाना!

Maharashtra Politics News: हेमंत गोडसे पुन्हा एकदा मुंबईमध्ये ठाम मांडून बसले असतानाच छगन भुजबळ आणि दादा भुसेही मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे नाशिकवरुन महायुतीत आज निर्णय होण्याची शक्यता आहे.
Lok Sabha Election 2024, Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis
Lok Sabha Election 2024, Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra FadnavisSaam TV

Nashik Loksabha Constituency News:

नाशिक लोकसभेच्या जागेवरुन महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. ही जागा राष्ट्रवादीकडे जाणार असून छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र नाशिकची जागा आपल्यालाच मिळावी यासाठी हेमंत गोडसे ठाम आहेत. आज हेमंत गोडसे पुन्हा एकदा मुंबईमध्ये ठाम मांडून बसले असतानाच छगन भुजबळ आणि दादा भुसेही मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे नाशिकवरुन महायुतीत आज निर्णय होण्याची शक्यता आहे.

नाशिकचा तिढा सुटेना..

नाशिकच्या जागेवरून (Nashik Loksabha) महायुतीमधील तिढा कायम असून हेमंत गोडसे बंडाच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. आज पुन्हा एकदा हेमंत गोडसे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या भेटीसाठी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. या भेटीमध्ये नाशिकच्या जागेबाबतचा १० पानी अहवाल मुख्यमंत्र्यांना देणार आहेत.

हेमंत गोडसे, छगन भुजबळ मुंबईत...

हेमंत गोडसेंपाठोपाठ मंत्री छगन भुजबळही (Chhagan Bhujbal) मुंबईकडे रवाना झाले आहेत. नाशिकची जागा छगन भुजबळ यांना मिळणार असल्याची चर्चा असून मुंबईमध्ये भुजबळ कुणाची भेट घेणार ? उमेदवारीबाबत काय निर्णय होतो याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Loksabha Election 2024)

Lok Sabha Election 2024, Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis
Aditya Thackeray News: ईडी, सीबीआय, आयटी, भाजपचे मित्रपक्ष.. आदित्य ठाकरेंचा घणाघात

दादा भुसेही तातडीने मुंबईकडे रवाना..

एकीकडे हेमंत गोडसे आणि छगन भुजबळ मुंबईकडे रवाना झाल्यानंतर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) मालेगावहून तातडीने मुंबईकडे रवाना झाले आहेत. हेमंत गोडसे, भाऊ चौधरी आणि शिवसेनेचे पदाधिकारी सकाळपासून मुंबईत ठाण मांडून बसले असतानाच आता दादा भुसेही मुंबईला गेल्याने नाशिकच्या जागेवरुन मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज हा तिढा सुटणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Lok Sabha Election 2024, Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis
Fight Between Two Group : छत्रपती संभाजीनगरमध्ये दुष्काळाची दाहकता; पाण्यावरून 2 गटात हाणामारी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com