Fight Between Two Group : छत्रपती संभाजीनगरमध्ये दुष्काळाची दाहकता; पाण्यावरून 2 गटात हाणामारी

Fight Between Two Group in Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरातही नागरिक पाण्यासाठी वणवण फिरत आहेत. आता याच पाणी भरण्यावरून छत्रपती संभाजीनगरात २ गटात हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे.
Mumbai police
Mumbai police Saam Tv

रामनाथ ढाकणे, छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar :

उन्हाळा सुरु होऊन काही दिवस झाले असतानाच, राज्यातील काही भागात पाण्याच्या समस्या जाणवू लागल्या आहेत. राज्यातील काही जिल्हातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. मराठवाड्यातही दुष्काळाची दाहता जाणवू लागली आहे. छत्रपती संभाजीनगरातही नागरिक पाण्यासाठी वणवण फिरत आहेत. आता याच पाणी भरण्यावरून छत्रपती संभाजीनगरात २ गटात हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे.

मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता आतापासूनच दिसायला सुरुवात झाली आहे. याचदरम्यान, छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील पाणी भरण्यावरून लोकांमध्ये मारहाण झाली आहे. बोअरवेलचं पाणी भरण्यावरून भास्कर आरगडे आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांनी ताराचंद ठोसे आणि त्यांच्या पत्नीला मारहाण केल्याची घटना घडली. सदर घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आला आहे.

Mumbai police
Water Scarcity : अवलकोंडा तलावात पुढील आठ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा; उदगीर परिसरात पाणीटंचाईची गंभीर समस्या

नेमकं काय घडलं?

छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमध्ये नागरिक पाण्यासाठी वणवण फिरत आहे. वाळूजमधील बोअरवेलवर भास्कर आरगडे आणि त्यांचे इतर सहकारी, ताराचंद ठोसे आणि त्यांची पत्नी पाणी भरण्यासाठी आले होते. त्यावेळी भास्कर आरगडे आणि त्यांचे इतर सहकाऱ्यांचे ताराचंद ठोसे आणि त्यांच्या पत्नीसोबत वाद झाला. यानंतर हे प्रकरण पोलिसांत गेलं. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याची मिळत आहे.

Mumbai police
Palghar Water Crisis : पालघर जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट; धरणांत ४० टक्केच साठा

पाण्यासाठी महिलांचा मोर्चा

तत्पूर्वी, छत्रपती संभाजीनगर शहरातील पुंडलिक नगर परिसरातील काही दिवसांपूर्वी पाणी आलं नव्हतं. त्यावेळी या परिसरातील महिला चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. महिलांनी पाण्याच्या टाकीवर मोर्चा काढत मुख्य गेटलाच कुलूप ठोकले होते. महिलांनी मोर्चा काढला, त्यावेळी पाणी सोडणारा कर्मचारी हा मध्यधुंद अवस्थेत असल्याचं पहायला मिळालं. त्याने महिलांशी अरेरावीची भाषा केल्याचे सुद्धा समोर आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com