Palghar Water Crisis : पालघर जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट; धरणांत ४० टक्केच साठा

Water stock in Dams in Palghar : पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पाच्या धामणी, कवडास, ढेकाळे, कुरंझे, अस्वाली या धरणांमधील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे.
Palghar water issue News
Palghar water issue NewsSAAM TV

Water Stock in Dams in Palghar District :

पालघर : यंदा कमी पाऊस झाल्याने धरणात पाणी साठले नाही. अगोदरच कमी पाणी असल्याने जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावंत होते. आता (Palghar) पालघर जिल्ह्यात असलेल्या धरणांमध्ये सध्या चाळीस टक्केच पाणीसाठा असल्याने येत्या काही दिवसात जिल्ह्यावर (Water Scarcity) पाणीटंचाईचा संकट येणार आहे. (Latest Marathi News)

Palghar water issue News
Pimpri Chinchwad : उद्यानातील १ हजार झाडे वाचविण्यासाठी अनोखा निर्णय; पिंपरी चिंचवडमधील शेकडो नागरिकांचा मतदानावर बहिष्कार

पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पाच्या धामणी, कवडास, ढेकाळे, कुरंझे, अस्वाली या धरणांमधील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. अजूनही पावसाला अडीच ते तीन महिने असल्याने पालघरसह (Vasai) वसई- विरार महानगरपालिका आणि मीरा- भाईंदर (Mira Bhayandar) महानगरपालिकेला येत्या काही दिवसात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. आगामी दोन- अडीच महिन्यात दोन्ही महापालिकेतील पाणी पुरवठ्यात कपात होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Palghar water issue News
Dhule News : दुकानाला लागलेल्या आगीत मोटर दुकान जळून खाक; लाखोंचे नुकसान

जिल्ह्यातील सर्वात मोठे असलेल्या सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणात सध्या ४० टक्के पाणीसाठा असून या धरणामधून जिल्ह्यातील शेतीसाठी पाणी सोडलं जाते. त्यामुळे अजूनही काही दिवस कालव्यामार्फत शेतीसाठी पाणी सोडलं जाणार असल्याने मेपर्यंत जिल्ह्यासह वसईवर आणि मीरा-भाईंदर महानगरपालिकांना पाणीटंचाई भासणार असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आल आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com