Today's Marathi News Live: यवतमाळ वाशिम लोकसभेचा तिढा सुटला, राजश्री पाटील यांना उमेदवारी

Maharashtra Live News and Update in Marathi (3 April 2024) : राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा.
Ajchya Marathi Batmya Live 3 April 2024 | Latest Update Breaking News on Maratha Reservation, Uddhav Thackeray Manohar Joshi, MNS and on overall Maharashtra
Ajchya Marathi Batmya Live 3 April 2024 | Latest Update Breaking News on Maratha Reservation, Uddhav Thackeray Manohar Joshi, MNS and on overall MaharashtraSaam TV

यवतमाळ वाशिम लोकसभेचा तिढा सुटला, राजश्री पाटील यांना उमेदवारी

महायुतीकडून राजश्री पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. राजश्री पाटील या खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी असून त्या यवतमाळच्या नेर तालुक्यातील सारंगपूर येथील रहिवाशी आहेत.

जिथे जुनं घर तिथेच घर द्या; विक्रोळीतून आदित्य ठाकरेंचा विरोधकांवर हल्लाबोल

स्ट्रीट फर्निचर घोटाळा आम्ही काढला आणि यांनी क्रेडिट घेतलं

कोटेचा यांनी सभागृहाला खोटं सांगितलं, हे कंत्राट रद्द झालं मात्र नाही झालं

आताच हे खोटं बोलतात मग पुढे किती बोलतील

दुसरे उमेदवार गोयल म्हणतात झोपडपट्टी हटवून मिठागर जागेवर पाठवायचे

हे चुकीचे आहे... जिथं घरं तिथेच घरं द्या

मुंबई करांच्या मुळावर हे भाजप उठले आहेत

संविधान बदलून यांना नाही द्यायचा

ज्याला निवडणु द्याल त्यांनी महाराष्ट्र विकास यावरच लक्ष दिलं

मशाल पेटली पाहिजे... घरातल्या चुली तरच पेटतील

जाहीर झालेली उमेदवारी बदलावी लागण्याची नामुष्की, अंबादास दानवे यांनी ट्वीट करून शिंदे गटाला डिवचलं

शिवसेनेत, मातोश्रीवर सन्मान मिळत होता तो हेमंत पाटील यांना पचवता आला नाही. शिवसेनेतील स्वातंत्र्य सोडून भाजपमध्ये गेले, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले आहेत. जाहीर झालेली उमेदवारी केवळ भाजपचा दबाव म्हणून बदलावी लागावी, यापेक्षा मोठी नामुष्की काय असावी. असा दबाव उद्धव ठाकरेंवर टाकण्याची हिंमत कधीच कोणाची झाली नाही. लोकसभा हा तर ट्रेलर आहे. विधानसभेत पूर्ण पिक्चर पहायला मिळेल, असं म्हणत अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे गटाला डिवचलं आहे.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १.४६ कोटीचं सोनं जप्त

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १.४६ कोटी रुपयांच सोन जप्त

सोन्याचे दागिने परिधान करून तसेच l कपड्यातून आणि ट्रॉली बॅगेत लपवून सुरू होती सोन्याची तस्करी

पाच वेगवेगळ्या प्रकरणात एकूण २.५२ किलो सोनं जप्त

मुंबई कस्टम्स विभागाची कारवाई

पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा लोकसभा तुतारी चिन्हावर लढवावी, पवार गटाचा प्रस्ताव

तुतारी चिन्हावर पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा लोकसभा लढावी

पवार गटाचा प्रस्ताव

पण पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसच्या तिकीटावरच लढण्याची भूमिका घेतली

सुत्रांची माहिती

साताऱ्याबाबत पवार गटानं निर्णय घ्यावा, काँग्रेसची भूमिका

काँग्रेसचे चंद्रकांत हांडोरे, भाजपच्या मेधा कुलकर्णी यांनी घेतली राज्यसभा खासदारकीची शपथ

राज्यसभा सभापती जगडीप धणखड यांनी दिली शपथ

आज काही खासदार निवृत्त झाल्याने नव्या खासदारांना दिली शपथ

मेधा कुलकर्णी यांनी संस्कृत भाषेतून शपथ घेतली

संस्कृत भाषा ही सर्व भाषेची जननी आहे

मला माझ्या वरिष्ठांनी संधी दिली त्यांचे आभार

उपराष्ट्रपतींनी आम्हाला शपथ दिली

नवीन संसदेची इमारत खूप चांगली आहे

हिंजवडीत आढळला बॉम्ब सेल, परिसरात एकच खळबळ

हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीतील मान - म्हाळुंगे रोडवरील ब्लोरिस सोसायटीच्या मागे पी एम आर डी एच ब्रिजच खोदकाम जेसीबी मशीन ने सुरू असताना हा बॉम्ब शेल आढळून आला आहे. आढळून आलेला हा बॉम्ब सेल हा पूर्णपणे गंजलेला असून त्यापासून नागरिकांच्या जीवाला कोणताही धोका उद्भवू शकणार नाही असं हिंजवडी पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आल आहे. बॉम्ब सेल आढळून आल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी लगेच बॉम्ब शोधक व नाशक पथकाला बॉम्ब सेल त्यांच्या कडे सुपूर्द केल आहे. मिळून आलेला बॉम्ब सेल हिंजवडी पोलीस हे लष्कराच्या सदन कमांड कडे सुपूर्द करण्यासाठी आवश्यक असलेलं पत्रव्यवहार करत आहेत.

मराठा आरक्षण वैध की अवैध ? हायकोर्टाच्या बेंचसमोर होणार सुनावणी

मराठा आरक्षण वैध की अवैध ? या सुनावणीत मोठी घडामोड

महाराष्ट्र राज्य आरक्षण कायदा 2024 ला आव्हान याचिकेवर मोठा फैसला

हायकोर्टाच्या फुल बेंचसमोर होणार सुनावणी

- उच्च न्यायालय मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय यांनी घेतला महत्वपूर्ण निर्णय

- याच कायद्याअंतर्गत मराठा समाजाला 10टक्के SEBC आरक्षण

- सरकारने दिलेलं आरक्षण,कायद्याच्या कसोटीवर असल्याचा, महाधिवक्त्यांचा दावा

- मात्र,कायद्यावरंच उपस्थीत आहे साशंकता

- मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय यासह तीन न्यायमूर्तींच्या पूर्णपिठासमोर, लवकरच होणार सुनावणी निश्चित

- पुर्ण पीठ करणार कालनिश्चित सुनावणी

हिंगोली लोकसभेचा उमेदवार शिवसेना बदलणार?, आमदार संतोष बांगर यांची माहिती

Hingoli Politics :

हिंगोली लोकसभेसाठी शिवसेना उमेदवार बदलणार असल्याची माहिती शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी दिली आहे. हेमंत पाटील यांची उमेदवारी शिवसेनेच्या वतीने जाहीर करण्यात आली होती. मात्र आता हिंगोली लोकसभेत उमेदवार बदलण्यात येणार आहे. हिंगोली लोकसभेसाठी बाबुराव पाटील कवळीकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र हिंगोली लोकसभेचा शिवसेनेचा नवा शिलेदार कोण हे मुख्यमंत्री ठरवणार असल्याचे देखील बांगर म्हणाले.

जळगावचे भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचा ठाकरे गटात प्रवेश

जळगावचे भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचा ठाकरे गटात प्रवेश

मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून ठाकरे गटात प्रवेश

उन्मेष पाटलांचा पक्षप्रवेश हा जळगावमध्ये भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे

उन्मेश पाटील यांच्यासोबत पारोळ्याचे भाजपचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांचा देखील ठाकरे गटात प्रवेश

सध्या जळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडीचा एकही विद्यमान आमदार नाही

मनोज जरांगे पाटील पुढील आठवड्यात पुणे दौऱ्यावर

मनोज जरांगे पाटील पुढील आठवड्यात पुणे दौऱ्यावर

७ एप्रिल रोजी जरांगे पुणे दौऱ्यावर

पिंपरी आणि पुण्यातील विविध ठिकाणी देणार भेटी

बाणेर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या कार्यालयाचे उद्घाटन जरांगे यांच्या हस्ते होणार

नाशिकच्या जागेवर हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी द्यावी, त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नाशिकच्या जागेवर हेमंत गोडसे यांनाच उमेदवारी द्यावी

त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

त्र्यंबकेश्वर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक, देशभरातून लाखो भाविक त्रंबकेश्वरचरणी येतात

त्यामुळे शिवसेना आणि हिंदुत्वाच्या दृष्टीनं हा अत्यंत प्रतिष्ठेचा विषय

नाशिकची जागा शिवसेनेलाच घ्यावी आणि हेमंत गोडसेंनाचं उमेदवारी द्यावी

त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचं मुख्यमंत्र्यांना पत्र

तर ब्राह्मण महासंघाचा देखील भुजबळांच्या उमेदवारीला विरोध

रत्नागिरी - दापोलीतील वादग्रस्त साई रिसॉर्टच्या अनधिकृत बांधकामाच्या पाडकामाला झाली सुरुवात

Ratnagiri News

रत्नागिरी - दापोलीतील वादग्रस्त साई रिसॉर्टच्या अनधिकृत बांधकामाच्या पाडकामाला झाली सुरुवात

पुण्यातील कंपनीला दिले गेले आहे पाडकामाचे काम

साई रिसॉर्टच्या तिसऱ्या मजल्यावरील भिंती पाडण्याचं काम सुरू

अनधिकृत बांधकाम मी स्वतः तोडणार; मालक सदानंद कदम यांनी कोर्टामध्ये प्रतिज्ञा पत्राद्वारे दिली होती माहिती

साई रिसॉर्टच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त

तिसऱ्या मजल्यावरील भिंत पाडून त्या ठिकाणी पत्रा शेडची घेण्यात आली आहे परवान

सोलापूरमधील अक्कलकोट एमआयडीसी टेक्सटाईल कंपनीला भीषण आग

सोलापूरमधील अक्कलकोट एमआयडीसी टेक्सटाईल कंपनीला भीषण आग

एमआयडीसीतील टॉवेल उत्पादन करणाऱ्या कारखान्याला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता

अन्नपूर्णा टेक्स्टाईल कंपनीतून आगीमुळे येत आहेत धुराचे लोट

सोलापूर अग्निशामक दलाच्या जवानांकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू

कारखान्याला लागलेल्या आगीत कोणतीही जीवितहानी नाही

अग्निशामक दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल

बारामतीतून सुनेत्रा पवार दोन लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून येणार, सुनील शेळकेंचा दावा

बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार दोन लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून येणार

बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी स्टार प्रचारक सुनील शेळकेंचा विश्वास

शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे आज घेणार शरद पवारांची भेट

शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे आज घेणार शरद पवारांची भेट

शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक येथील निवासस्थानी ही भेट होण्याची शक्यता

ज्योती मेटे यांच्या पक्षप्रवेशाबाबत आज अंतिम चर्चेची शक्यता

शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून बीड लोकसभा मतदारसंघातून ज्योती मेटेंना उमेदवार मिळण्याची शक्यता

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, भंडाऱ्यातील बेला रोडवरील घटना

Bhandara News

नागपूरवरून साकोलीकडे जात असलेल्या अज्ञात ट्रॅकच्या चालकाने दुचाकीस्वाराला धडक देऊन पसार झाल्याची घटना घडली असून या घटनेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर ट्रकचालकाने अक्षरशः दुचाकीस्वाराला एक किमी पर्यत फरकडत नेत दुचाकीस्वाराला अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे.ही घटना भंडारा शहराजवळ असलेल्या बेला येथील साईप्रसाद हॉटेल समोर घडली आहे.

आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह आज तुरुंगातून बाहेर येणार

आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह आज तुरुंगातून बाहेर येणार

मागच्या ६ महिन्यांपासून संजय सिंह होते तुरुंगात

दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी ED ने केली होती अटक

काल सुप्रीम कोर्टात सिंह यांना जामीन मंजूर झाल्याने त्यांच्या सुटकेचा मार्ग झालाय मोकळा

आप कडून सिंह यांच्या सुटकेवेळी शक्तिप्रदर्शन केलं जाण्याची शक्यता

राहुल गांधी आज वायनाड लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरणार

काँग्रेस नेते राहुल गांधी आज वायनाड लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरणार

राहुल गांधी यांचा अर्ज दाखल करताना मोठं शक्तिप्रदर्शन केलं जाणार

राहुल गांधी दुसऱ्यांदा वायनाड =मधून लोकसभा निवडणूक लढवत आहेत

एकीकडे आज राहुल गांधी यांचं शक्तिप्रदर्शन होत असताना दुसरीकडे उद्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी देखील वायनाड मधे

भाजपचे उमेदवार के. सुरेंद्रन यांचा अर्ज भरण्यासाठी येणार

मनसे कामगार सेनेच्या अंतर्गत वादातून उपाध्यक्षावर प्राणघातक हल्ला

मनसे कामगार सेनेच्या अंतर्गत वादातून उपाध्यक्षावर प्राणघातक हल्ला

साकीनाका पोलीस ठाण्यात हत्तेचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल

दोन पदाधिकाऱ्यांसह १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे उपाध्यक्ष राज पार्टे यांच्यावर चाकू व गुप्तीने हल्ला झाल्याची घटना चांदिवली परिसरात घडली आहे

याप्रकरणी मनसे कामगार सेनेचे पदाधिकारी गजानन राणे व प्रतिक राणे यांच्यासह १५ ते २० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल

कार्यकर्त्यांमधील वाद मिटवण्यासाठी ते सर्व एकत्र आले असता पार्टे यांच्यावर हल्ला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com