Weather Report Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra weather : पावसाची उघडीप, किमान तापमानात घट, कसं असेल आजचे वातावरण

Maharashtra weather update News in Marathi : राज्यात किमान आणि कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

Weather Forecast News in Marathi : सध्या अवकाळी पावसाने उघडीप घेतली आहे, त्यामुळे राज्याच्या किमान आणि कमाल तापमान घट होत आहे. मागील चार दिवसांत राज्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. पण आता राज्यातील किमान तापमानात पुन्हा घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

आजपासून ढगाळ वातावरण लक्षणीय प्रमाणात कमी होईल. त्यामुळे स्वच्छ आकाशाखाली पृथ्वीच्या पृष्ठभागावरून दीर्घतरंगीय किरणोत्सर्ग अधिक प्रमाणात होईल. यामुळे स्वाभाविकच रात्रीच्या तापमानात तसेच पहाटेच्या सुमारास नोंदवले जाणाऱ्या किमान तापमानात टप्प्याटप्प्याने घट होईल. आज (ता. १७) राज्यात ढगाळ हवामानासह कमाल तापमानात चढ- उतार होण्याची शक्यता आहे. तर किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालाय. त्यामुळे राज्याच्या किमान आणि कमाल तापमानात घट होण्यास सुरुवात होईल. शनिवारी धुळ्यात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. धुळ्यात शनिवारी १३.६ अंश तापमानाची नोंद झाली. विदर्भातील ब्रह्मपुरी येथे किमान तापमान १५ अंशांवर होते. उर्वरित राज्याच्या किमान तापमानात चढ उतार पाहायाला मिळाली.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात आजपासून ढगाळ वातावरण नाहीसे होण्यास सुरुवात होईल. पुढील काही दिवसांत राज्यात थंडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. सध्या उत्तर महाराष्ट्रात कडाक्याची थंडी आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत राज्यभरात थंडी येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: पालघरमध्ये ठाकरे गटासह बविआला खिंडार; अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

Maharashtra Live News Update: आदिती तटकरेंच्या मतदार संघात शिंदे गटाची ताकद वाढलीपदाधिकाऱ्यांची भावना

Atal Pension Yojana: या सरकारी योजनेत दर महिन्याला मिळते ₹५०००; गुंतवणूकीचं संपूर्ण कॅल्क्युलेशन वाचा

Vaidehi Parshurami Photos: लाल साडीत खुललंं वैदेही परशुरामीचं सौंदर्य, फोटो पाहा

Vande Bharat Train : मोठी बातमी! देशात आणखी ४ वंदे भारत ट्रेन सेवेत, जाणून घ्या तुमच्या शहरातून धावणार का?

SCROLL FOR NEXT