Goddess Lakshmi : लक्ष्मी प्राप्तीसाठी फक्त खास 10 उपाय करा, तुमच्यावर सदा पैशांची कृपा राहील

laxmi prapti upay in marathi : तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती करायची असेल तर काही खास उपाय करणे फायद्याचे ठरेल. या खास उपायामुळे तुमच्यावर पैशांची कृपा राहील, वाचा सविस्तर
Goddess Lakshmi
Goddess LakshmiSaam tv
Published On

खास लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय व तोडगे

१.आर्थिक वृद्धीसाठी नेहमी शनिवारी गहू दळून आणा आणि गव्हामध्ये मूठभर काळे हरभरे घालावेत.

२. दारू,जुगार पर स्त्री गमन अशा इच्छा वा या सगळ्यात मन भरकटत असेल तर एकाग्र होऊन ४३ दिवस कालीमातेची आराधना करावी. असे केल्यास मन स्थिर होऊन लक्ष्मी टिकते.

३. आपण आस्तिक, नास्तिक, स्त्री, पुरुष, सुशिक्षित अशिक्षित कोणीही असो, उद्योग नोकरीमध्ये खूप मेहनत करता मेहनत करून आपल्याला अमर्यादित धन मिळते, परंतु धनसंचय होत नाही. अशासाठी शनिवारी काळा रंगाचे श्वानाला चपातीला तेल लावून खायला घालावे.

Goddess Lakshmi
Laxmi Pujan: घरात सुख-समृद्धी लाभावी म्हणून लक्ष्मीपूजना आधी घरातून बाहेर काढा 'या' गोष्टी

४. पैसे शरीराच्या डाव्या बाजूला असलेल्या सदराच्या खिशात ठेवावेत. म्हणजे हृदयाजवळ यामुळे धनाचा स्त्रोत अविरत राहतो.

५. जुनी चांदीची नाणी, कवड्या दुधाने दोन दिवस त्याची पूजा करून एकत्र रेशमी वस्त्रात किंवा पिवळ्या वस्त्रात बांधून ठेवल्या तर लक्ष्मण प्रसन्न होते.

Goddess Lakshmi
Vastu Tips: कोणाकडूनही 'या' वस्तू फुकट घेऊ नका, संकटात याल

६.गुरुवारच्या दिवशी तुळशीच्या रोपाला दुधाने अर्घ्य दिल्यास धनसंपत्तीच्या कामात सहाय्य होते.

७.धनप्राप्तीसाठी काळी हळद हा खूप छान तोडगा आहे. काळी हळद जवळ ठेवावी त्यामुळे व्यक्ती धनवान होते.

८. काळी हळद बाळगणाऱ्या व्यक्तीने मुळा, गाजर, सुरण अजिबात खाऊ नये दररोज उगवत्या सूर्याचे दर्शन घेऊन ||ओम सूर्याय नमः|| या मंत्राचा जप सूर्याकडे पाहून १०८ वेळा करावा धनप्राप्ती होईल.

Goddess Lakshmi
Vastu Tips: वास्तुनुसार घरात 'या' गोष्टी रिकाम्या ठेवू नका

९. एखाद्या शुक्रवारी कमळाचे फूल आणून ते लाल कपड्यात गुंडाळून आपल्या तिजोरीत किंवा कपाटात ठेवल्यास तिजोरीतील धनाचा साठा वेगाने वाढतो. त्याबरोबर कामाबद्दल सुद्धा प्रामाणिकपणे करावा.

१०.शास्त्राप्रमाणे प्रत्येक पौर्णिमेला सकाळी दहा वाजता पिंपळाच्या वृक्षावर देवीचे आगमन होते. म्हणून ज्या व्यक्तीला आर्थिक विवंचना असेल त्या व्यक्तीने यावेळी पिंपळाच्या वृक्षाची आणि लक्ष्मीची आराधना करावी.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com