भरत मोहोळकर, साम प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने वातावरण ढवळून निघालंय. त्यातच साताऱा जिल्ह्यातील माण-खटावमधून भाजपने विद्यमान आमदार जयकुमार गोरेंना मैदानात उतरवलंय. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने विधानपरिषदेचे माजी आमदार प्रभाकर घार्गेंना रिंगणात उतरवलंय..त्यामुळे माण-खटावमध्ये काँटे की टक्कर होणार आहे.
मात्र मतदारसंघातील प्रश्न सुटले नसल्याने परिवर्तन आवश्यक असल्याचं प्रभाकर घार्गेंनी म्हटलंय.. तर जयकुमार गोरेंनी विकासकामांच्या जीवावर विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. दुष्काळी मतदारसंघ असलेल्या माण खटाव मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर 2009 मध्ये पहिल्याच निवडणुकीत जयकुमार गोरेंनी अपक्ष, त्यानंतर काँग्रेस आणि 2019 मध्ये भाजपच्या तिकीटावर विजय मिळवला. तर त्यांच्या मताधिक्यात मोठा चढ-उतार दिसून आलाय. मात्र 2019 मधील मतांचं समीकरण नेमकं कसं होतं? पाहूयात.
जयकुमार गोरे, भाजप, 91,469
प्रभाकर देशमुख, राष्ट्रवादी, 88,426
शेखर गोरे, शिवसेना, 37,539
3 हजार 43 मतांनी जयकुमार गोरेंचा विजय
लोकसभा निवडणुकीत रणजितसिंह निंबाळकरांचा पराभव झाला असला तरी त्यांना माण खटाव मतदारसंघातून तब्बल 23 हजार 355 मतांची आघाडी मिळाली होती. त्यातच आता पारंपरिक विरोधक शेखर गोरेंनी जयकुमार गोरेंना पाठींबा दिल्याने जयकुमार गोरेंची ताकद वाढलीय.
तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह स्थानिक नेत्यांची मोट बांधत घार्गेंनी फिल्डिंग लावलीय..मात्र सत्यवान ओंबासे या उमेदवाराने ट्रम्पेटचा तुतारी असा उल्लेख करत प्रचार केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.. तर आता दोन्ही बाजूने जोरदार तयारी सुरु असल्याने 2019 ला काठावर पास झालेले जयकुमार गोरे पुन्हा विजयी चौकार मारणार की प्रभाकर घार्गे गुलाल उधळणार? याची उत्सुकता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.