Uddhav Thackeray: स्वतःच्या वडिलांचा फोटो लावा आणि मैदानात उतरा; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

Maharashtra Election: डोंबिवली येथील सभेत बोलतांना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. महाराष्ट्र हिताच्या आड विरोधात आपला लढा सुरू असल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेत.
Uddhav Thackeray: स्वतःच्या वडिलांचा फोटो लावा आणि मैदानात उतरा; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना आव्हान
Published On

जर खरी मर्दाची औलाद असेल तर स्वता:च्या वडिलांचा फोटो लावा आणि मैदानात उतरा, असं जोरदार आव्हान उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना दिलंय. ते डोंबिवलीतील सभेत बोलत होते. डोंबिवलीतील सभेत बोलतांना उद्धव ठाकरेंनी सुरुवातपासूनच मुख्यमंत्री शिंदे, भाजप यांच्यावर हल्ला चढवला. बाळासाहेबांचा फोटो लावून प्रचार करणाऱ्या एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंनी स्वता:च्या वडिलांचा फोटो लावून मतं मागायला सांगितली.

जो कोणी माझ्या महाराष्ट्राच्या हिताच्या आड येईल, त्याच्याविरोधात लढा देईन ही शपथ घेऊन आपण मैदानात उतरल्याचं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदेंना आव्हान दिलं. दरम्यान दोपोलीच्या सभेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं होतं. तुम्ही एकनाथ शिंदेंना हलक्यात घेतलं म्हणून टांगा पलटी घोडे पसार झाले आणि शिवसेना फोडल्याचं शिंदे म्हणाले होते. त्यालाच उत्तर म्हणून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना चॅलेज केलंय.

Uddhav Thackeray: स्वतःच्या वडिलांचा फोटो लावा आणि मैदानात उतरा; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना आव्हान
Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या सभेच्या खुर्च्या रिकाम्या, पण निवडणुकीच्या दिवशी...; उद्धव ठाकरेंना नेमकी कसली भीती?

भाजप गद्दारांना घेऊन तुम्ही आमच्या अंगावर येत आहे. गद्दार शिवसेना संपवण्याचा विचार करत आहेत. ज्यांनी आमच्या पक्षाचं नाव, चिन्ह चोरलं त्या मिंधेंना म्हणजेच एकनाथ शिंदेंना जाहीर आव्हान देतोय. शिंदे तुम्ही जर मर्दाची औलाद असाल तर स्वता:च्या वडिलांचा फोटो लावा आणि मैदानात उतरा. शिंदेंचे कर्तृत्व शु्न्य आहे, त्यांच्या मुलाला थेट खासदार केलं आणि हे आमच्या अंगावर येत आहेत.शिंदे हे गद्दारी करत आहेत आणि मोठं मोठ्या होर्डिंगस लावत आहेत. यावेळी उद्धव ठाकरेंनी महायुतीच्या जाहिरातीच्या टॅगलाईनवरून टोमणा मारला.

Uddhav Thackeray: स्वतःच्या वडिलांचा फोटो लावा आणि मैदानात उतरा; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना आव्हान
CM Eknath Shinde On Uddhav Thackeray: 'कलंक' वक्तव्यावरील वादात CM एकनाथ शिंदेंची उडी; बाळासाहेबांच्या नावाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंना सुनावले

आमचं व्यवस्थित चालू होतं अटल जी होते,अडवाणी होते, प्रमोद महाजन यांनी त्यांची ओळख करून दिले. पण २०१९ नंतर कोणीतरी मिठाचा खडा टाकला. तेव्हाचा भाजप काहीतरी सिद्धांत जपणारा होता. पण आताचा भाजप खूप संकरीत झालाय. आधीच्या भाजप इकडचे तिकडे भ्रष्टाचारी नेत्यांना पक्षात घेतल्यानंतर भाजपची अशी अवस्था झाल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

आरएसएस आणि भाजपने अशी काही सदस्य दिले ज्यांनी आपल्या संघासाठी घरं-दारं सोडली, अशा सदस्यांच्या कामाबद्दल मला आदर आहे. पण मी आता प्रश्न करतो भाजप आणि संघाच्या खऱ्या सदस्यांना तुम्ही या अशा भाजपसाठी कार्य केलं होतं का? अनेकांनी घरे सोडून आरएसएस वाढला. गेल्या लोकसभा निवडणुकीत तर अशी कमाल झाली.

Uddhav Thackeray: स्वतःच्या वडिलांचा फोटो लावा आणि मैदानात उतरा; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना आव्हान
CM Shinde: तुम्ही एकनाथ शिंदेला हलक्यात घेतलं, दापोलीच्या सभेत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं

भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांना मस्ती चढलीय. मागील लोकसभेच्या वेळी नड्डा म्हणाले, भाजप आता स्वंयपूर्ण झालाय, त्याला आता आरएसएसची गरज नाही.म्हणजे जे त्यांनी शिवसेनेबाबत केलं वापरलं आणि फेक तशीच अवस्था ते संघासोबत करणार आहेत. डोंबिवली येथे भाजपने आपल्या वचननाम्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने बिझनेस पार्क उभारण्यांच वचन भाजपने आपल्या जाहीरनाम्यात दिलं आहे.

दरम्यान पैसे पण यासाठी लागणारी जमीन ही अदानीच्या घशात घालत आहेत.बाकीच्या लोकांनी काय त्यांची भाडी घासयची का असा सवाल उद्धव ठाकरेंनी यावेळी केला. केला. येथून नोकऱ्या गुजरातला निघून जात आहेत. तर गुराती लोकांना जमिनी दिल्या जात आहे. यामुळे गुजरातमधील लोकांनाच नोकऱ्या मिळतील.

भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी म्हटलं होतं की, भाजप आता स्वंयपूर्ण झालाय. आता आरएसएसची गरज नाही. ज्या प्रमाणे शिवसेनेला वापरून फेकून दिलं त्याचंप्रमाणे संघाचं करणार होते. भाजपचं हिंदुत्त्व खोटं आहे.शिवसेनेचं हिंदुत्व मनात राम आणि हाताला काम देणारं आहे. तर भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणारं आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस म्हणतात मतांचं धर्मयुद्ध करा. मग निवडणूक आयोगाला माझा प्रश्न आहे, धर्मयुद्ध करा हे तुमच्या आचारसंहितेला चालत असेल तर आमच्या मशाल गाण्यामधील जय शिवाजी, जय भवानी आणि हिंदू शब्द काढण्यास का सांगितले, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

मागील लोकसभा निवडणुकीच्यावेळी मशाल गीत तयार केल्यानंतर निवडणूक आयोगाने या गीतमधील काही शब्दांवर आक्षेप घेतला होता. गाण्यामधील हिंदू तुझा धर्म, जय शिवाजी, जय भवानी हे शब्द काढून टाकण्यास सांगितलं होतं. जर हे शब्द चाल नाहीत तर मतांचे धर्मयुद्ध करणाऱ्या फडणवीसांचे शब्द कसे काय चालतात असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. यावरून देवेंद्र फडणवीसांना टोला मारताना उद्धप ठाकरे म्हणाले, हे मतांचे धर्मयुद्ध करायला निघाले आहेत, पण त्यांनी आधी त्यांचं जॅकेट सांभाळवं असा उपरोधिक टोला ठाकरेंनी लगावला.

छत्रपती शिवाजी की जय म्हणायचं आणि महाराष्ट्र लुटणाऱ्यांना मतदान करायचं? महाराज असते तर आपल्याला कटेलोट करून टाकलं असतं,असं उद्धव ठाकरेंनी महायुतीला मतदान करू नका असं सांगितलं. मी लढतोय आणि लढणार आणि जो कोणी माझ्या महाराष्ट्राच्या हिताच्या आड येईल, त्याच्याविरोधात लढा देणार ही शपथ घेऊन मैदानात उतरल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

भाजप गद्दारांना घेऊन तुम्ही आमच्या अंगावर येत आहे. गद्दार शिवसेना संपवण्याचा विचार करत आहेत. त्यांनी पक्षाचं नाव, चिन्ह चोरलं त्या मिंधेंना जाहीर आव्हान देतोय. शिंदे तुम्ही जर मर्दाची औलाद असाल तर स्वता:च्या वडिलांचा फोटो लावा आणि मैदानात उतरा, असं ठाकरे म्हणालेत. महाराष्ट्राला लूटेंगे और दोस्तो मे बाटांगे हा नारा देणाऱ्यांच्या विरोधात मी उतरलो आहे.

मी त्यांना महाराष्ट्र लुटू देत नव्हतो. त्यामुळे त्यांनी माझे सरकार पाडले. यांना सगळ्यात आधी मी मंत्री पद दिले. अन्यथा ते मुख्यमंत्री झाले नसते. गद्दारी करुन मुख्यमंत्री झाले. त्यांच्या मुलालाही खासदारकीच्या बोहल्यावर मी चढविले. त्यांना मोठे करणारे लोक आजही माझ्यासोबत आहेत. ते त्यांना पुन्हा लहान करू शकतात असेही ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com