Maharashtra CM Eknath Shinde: विदर्भ दौऱ्यावर असताना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Thackeray Group Leader Uddhav Thackeray) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस (Deputy CM Devendra Fadnavis) हे नागपूरला लागलेला कलंक असल्याची टीका केली होती. यावरुन राज्यातील राजकारण (Maharashtra Politics) तापले आहे.
अशातच कलंकवरुन सुरु झालेल्या राजकारणात आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी देखील उडी घेतली आहे. त्यांनी यावरुन थेट उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना कलंकीत असं म्हणणं हास्यास्पद असल्याची टीका त्यांनी केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी सांगितले की, 'उद्धव ठाकरेंनी 2019 साली बाळासाहेब ठाकरेंची भूमिका आणि विचारांना तिलांजली दिली. बाळासाहेबांच्या नावावर त्यांनी कलंक लावला. अशा कलंकीत लोकांनी देवेंद्र फडणवीसांवर कलंकाचा आरोप लावायचा हे हास्यास्पद आहे. याच्यावरुन उद्धव ठाकरे यांच्या पायाखालची वाळू घसरल्याचे दिसून येत आहे.'
उद्धव ठाकरे यांनी विदर्भाच्या दौऱ्यावर असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती. फडणवीस हे नागपूरला लागलेला कलंक असल्याची जहरी टीका त्यांनी केली होती. यावेळी त्यांनी फडणवीस यांची राष्ट्रवादीसोबत जाणार नसल्याची जुनी व्हिडिओ क्लिप दाखवत ही टीका केली होती. सत्तापिपासू लोकं तुमच्यासोबत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. उद्धव ठाकरे यांच्या या आरोपानंतर आता सामनामधून देखील देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
सामनाच्या अग्रलेखातून फडणवीसांवर निशाणा साधण्यात आला आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे की, 'ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचा आरोप केला त्यांच्यासोबत पंक्तीला बसून खाणे हा कलंक आहे. फडणवीस यांनी स्वतःच्या मनाची व्यथा अशा प्रकारे व्यक्त केलेली दिसते. आता कोण कोणाच्या पंक्तीला बसून काय खात आहे हे संपूर्ण महाराष्ट्र पाहतो आहे. हा शेण खाण्याचा कलंकित प्रकार फक्त महाराष्ट्रात नव्हे, तर देशभर सुरू आहे.देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरला कलंकित केले. हा कलंक-बाण त्यांच्या भक्तमंडळाच्या काळजात घुसला व त्यांनी त्यावर थयथयाट सुरू केला.'
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.